शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:54 IST

रहिवासाच्या दृष्टीने शहर आदर्शवत राखणे हेच मोठे कार्य असून, नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

नाशिक : रहिवासाच्या दृष्टीने शहर आदर्शवत राखणे हेच मोठे कार्य असून, नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे आणि हिमगौरी आडके यांना कार्यक्षम नगरसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने नार्इ$सच्या सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे यांनी दुर्दैवाने समाजातील केवळ वाईट बाबीच सातत्याने पुढे येत असल्याने वाईटच अधिक घडत आहे, असाच सर्वांचा समज होऊ लागला आहे. परंतु, तशी वस्तुस्थिती नाही, हे समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर गांगुर्डे, मुर्तडक व आडके यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात मावळते अध्यक्ष सुनील भायभंग यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील आढावा घेऊन सूत्रे नूतन अध्यक्ष हेमंत राठी व त्यांच्या कार्यकारिणीकडे सोपवित असल्याचे सांगितले. परीक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी निवडीच्या प्रक्रियेचे विवेचन केले.सूत्रसंचालन आशिष कटारिया यांनी केले तर पुरस्कारार्थींचा परिचय सचिन अहिरराव यांनी करून दिला. यावेळी माजी अध्यक्ष विक्रम सारडा, जितूभाई ठक्कर, संजीव नारंग, दिग्विजय कपाडिया, स्थायी समितीचे विद्यमान सभापती उद्धव निमसे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार वैशाली बालाजीवाले आदी उपस्थित होते.आहे ते राखण्याला प्राधान्यकाही वर्षांपूर्वी ज्या गोष्टी विकास म्हणून बघितल्या जात होत्या, त्या सोडून माणसं पुन्हा निसर्गाकडे आणि नैसर्गिक बाबींकडे वळत आहेत. म्हणजेच त्यावेळी ज्याला आपण विकास म्हणत होतो, तो विकास नव्हता हे आता अनेकांच्या लक्षात आले आहे. नाशिकमध्ये अनेक चांगल्या बाबी असून, त्या कायम राखण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.नूतन अध्यक्षपदी हेमंत राठीनाशिक सिटीझन्स फोरमच्या आगामी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी आज नूतन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ उद्योजक आणि महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष हेमंत राठी यांनी पदभार स्वीकारला. नूतन कार्यकारिणीत त्यांच्यासमवेत उपाध्यक्षपदी संजीव बाफना, खजिनदारपदी आशिष कटारिया तर कार्यकारिणीत नरेंद्र बिरार, अविनाश पाटील, विक्रम कपाडिया, संदीप सोनार यांचा समावेश असून, या सर्वांनी सूत्रे स्वीकारली.समाजात सर्वच काही वाईट चालले आहे असे मुळीच नाही. चांगले म्हणजे पुण्याचे काम करणाऱ्यांचे प्रमाण कमी जरी असले तरी पुण्याचे वजन अधिक असल्यामुळे समाजात समतोल साधला जातो.- सुरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक