शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आउटसोर्सिंगच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:48 IST

महापालिकेत सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंगने भरती करण्याची कार्यवाही होत असून, त्याला सफाई कर्मचारी विकास युनियनने विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.३०) भर पावसात निदर्शने केली.

नाशिक : महापालिकेत सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंगने भरती करण्याची कार्यवाही होत असून, त्याला सफाई कर्मचारी विकास युनियनने विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.३०) भर पावसात निदर्शने केली. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या सेल्फी हजेरीसदेखील विरोध करण्यात आला असून, यासंदर्भात प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले.शासनाकडे १४ हजार कर्मचाऱ्यांच्या जागांचा आकृतिबंध पाठविण्यात आला असून तो मंजूर करण्याऐवजी आउटसोर्सिंगचा पर्याय निवडला जात असल्याचा आरोप युनियनने गमे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. संघटनेचे नेते सुरेश मारू, सुरेश दलोड, ताराचंद पवार, कस्तुरी पवार, जिजा साळवे यांनी दिलेल्या निवेदनात सेल्फी हजेरीला कडाडून विरोध केला आहे. सफाई कामगारांची पदे मुळातच कमी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. बळजबरीने सेल्फी हजेरी घेतली जात असून त्यास विरोध असल्याने ही कार्यवाही त्वरित थांबवावी अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पालिकेत सफाई कामगारांची संख्या कमी होत आहे. सध्या अवघे १९०० कर्मचारी असून त्यातील तीनशे कर्मचारी कामाच्या सोयीने अन्य विभागात काम करतात. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सफाई कामगारांची भरती करण्याऐवजी सरळ आउटसोर्सिंगने कामे करून घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा होऊनही उपयोग झालेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक