शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेच्या वतीने जिल्ह्यात केंद्राच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:24 IST

शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलनाची दखल घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

ठळक मुद्देनिषेधाच्या घोषणा : जिल्ह्यात ठिकठिकाणी लावले काळे झेंडे

नाशिक : शेतकरी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात किसान सभा-आयटकच्या वतीने निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावून केंद्र सरकारविरोधात घाेषणाबाजीदेखील करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील आंदोलनाची दखल घेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करीत असून, ठाण मांडून बसलेले आहेत. त्यास सहा महिने पूर्ण होत असून शेतकरीविरोधी तीन जुलमी कायदे रद्द करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.  शेतकरीविरोधी तीन कायदे रद्द करावेत, लेबर कोड कायदा रद्द करावा, मोफत लस आणि उपचार देण्यात यावा, चार महिने मोफत धान्य देण्यात यावे, बेरोजगारांना ६००० रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रद्द करण्यात यावा, राज्य सरकारांना जीएसटीचे पैसे देण्यात यावेत, वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कर्मचारी घोषित करावे, रोजगार हमी कर्मचाऱ्यांना ३०० रुपये प्रतिदिन देण्यात यावेत, रिक्त पदे भरण्यात यावीत, ईपीएफ पेन्शनर्सला किमान नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी किसान सभेचे राज्य सचिव, आायटकचे  जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, संघटक विजय दराडे,  सुखदेव केदारे,  दत्तात्रय गांगुर्डे, अरुण म्हस्के, सखाराम दुर्गुडे, उज्ज्वल गांगुर्डे  यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. सुनीता कुलकर्णी, किरण डावखर, मकसूद अन्सारी, मीना आढाव, देवीदास भोपाळे, सुभाष काकड, भाऊसाहेब शिंदे, प्रकाश नाईक, नरेंद्र कांबळे, चित्रा जगताप, हसीना शेख आदी सहभागी झाले होते.केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेधकेंद्र सरकारलादेखील सात वर्षं पूर्ण होत असून, गेल्या सात वर्षांच्या कालावधीत केंद्राने शेतकरी, कामगार, कर्मचारीविरोधी धोरण अवलंबिले असून  शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ निषेध दिन पाळण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातात काळे झेंडे फडकावत निषेध नोंदविला. अनेकांनी आपल्या घरांवर तसेच वाहनांवरही काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा विरोध दर्शविला. 

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन