शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाशिकमध्ये आयटीआय विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By श्याम बागुल | Updated: September 14, 2018 15:41 IST

सातपूर येथील शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना मशीनवर काम करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी हाफबाहींचा शर्ट घालून येऊ नये, असा नियम असल्याने शुक्रवारी काही विद्यार्थी फूलबाहींचा शर्ट घालून आले होते. त्यामुळे पर्यवेक्षक एम. ए. बागुल यांनी या विद्यार्थ्यांना संस्थेत येण्यापासून मज्जाव

ठळक मुद्देफुलबाहींचा शर्ट घातल्याचे कारण : शिक्षकांची दिलगिरी मानसिक त्रास देणा-या शिक्षकांनीदेखील दिलगिरी व्यक्त केली

नाशिक : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. संबंधित शिक्षकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.सातपूर येथील शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना मशीनवर काम करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी हाफबाहींचा शर्ट घालून येऊ नये, असा नियम असल्याने शुक्रवारी काही विद्यार्थी फूलबाहींचा शर्ट घालून आले होते. त्यामुळे पर्यवेक्षक एम. ए. बागुल यांनी या विद्यार्थ्यांना संस्थेत येण्यापासून मज्जाव केला. याचा राग आल्याने या विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदाधिका-यांशी संपर्क साधला असता भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश बेलदार, उपमहानगरप्रमुख मंगेश पवार, आकाश मोराडे, तसेच स्वप्नील पाखले, दत्ता गरकळ, विशाल पाटील आदींनी धाव घेऊन सदर शिक्षकांच्या विरोधात प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन पुकारले. सदर शिक्षक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देतात, विद्यार्थ्यांना मारहाण करतात, विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नाही, उपहारगृहाची सोय नाही, पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही, डासांचा त्रास होतो अशा अनेक तक्रारी संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. संस्थेचे समन्वयक प्रशांत बडगुजर यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करून त्यांची बाजू ऐकून घेतली. यापुढे असा त्रास होणार नसल्याची ग्वाही देऊन दिलगिरी व्यक्त केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले शिवाय मानसिक त्रास देणा-या शिक्षकांनीदेखील दिलगिरी व्यक्त केली. 

 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक