राजगृह हल्लाप्रकरणाचा निषेध राजगृह हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 08:48 PM2020-07-10T20:48:07+5:302020-07-11T00:10:11+5:30

नांदगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथाल निवासस्थान असलेले राजगृहची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, ...

Protest against Rajgruh attack case Demand for action in Rajgruh attack case | राजगृह हल्लाप्रकरणाचा निषेध राजगृह हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी

राजगृह हल्लाप्रकरणाचा निषेध राजगृह हल्लाप्रकरणी कारवाईची मागणी

Next

नांदगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथाल निवासस्थान असलेले राजगृहची तोडफोड करणाऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंच्या वतीने तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप मुटकुळे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली. जिल्हा कार्यध्यक्ष देवीदास मोरे, जिल्हा सचिव कपिल तेलुरे, होलार आघाडी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष जगदीश जाधव, राजाभाऊ गुडेकर, नांदगाव शहर कार्यध्यक्ष गौतम जगताप, कुणाल मोरे, अशोक जगताप, राहुल बागुल, सोमु पवार आदी यावेळी उपस्थित होते.
---------------
राजगृह प्रकरण: दोषींवर कारवाईची मागणी
दिंडोरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान असलेले ‘राजगृह’वर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत दोषींना तत्काळ अटक करून कारवाईची मागणी वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, युवक आघाडी,भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते नितीन भुजबळ, तालुकाध्यक्ष गणेश शार्दुल, युवा तालुकाध्यक्ष जयेश गांगुर्डे, श्याम गवारे, सुमित अहिरे, प्रशांत गांगुर्डे, बाळासाहेब शार्दुल, राहुल सोनवणे, आकाश निकम, देवा खरे, मयूर गांगुर्डे आदी उपस्थित होते.
------------------
‘राजगृह’ हल्ल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकांना निवेदन
नांदूरवैद्य : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर (मुंबई) येथील सदन राजगृहवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आणि बहुजन वंचित आघाडीच्या वतीने घोटी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक निरीक्षक जालिंदर पळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर वास्तूवर हल्ला करणाºया समाजकंटाकांना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रिपाइंचे तालुका कार्याध्यक्ष संजय सोनकांबळे, मदन रूपवते, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत रूपवते, जिल्हा सरचिटणीस मारु ती रूपवते, तालुका उपाध्यक्ष संतोष रूपवते, गणेश रूपवते, मयूर शिंदे, अभिजित नेटावटे, विलास बोराडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------
राजगृहावर हल्लाप्रकरणाचा कळवण येथे निषेध
कळवण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थानावर केलेल्या हल्ल्याचा कळवण येथे निषेध करण्यात आला. तसेच या प्रकरणातील दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी कळवण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार बी.ए. कापसे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. वंचित आघाडीचे तालुका महासचिव जगदीश खरे, युवा तालुकाध्यक्ष नरेंद्र गरु ड, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष राम बस्ते युवा तालुका महासचिव तुषार अहिरे, युवा तालुका उपाध्यक्ष समाधान इंगळे, युवा तालुका संपर्क प्रमुख सचिन आहिरे, किरण केदार, ऋ षिकेश जाधव निकम, नितीन बस्ते, अमोल बस्ते, मंगेश बस्ते, विकी पवार, वैभव वाघ, ललित सोनावणे, हर्षल पिंपळसे आदी उपस्थित होते.

Web Title: Protest against Rajgruh attack case Demand for action in Rajgruh attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक