शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा निषेध : नाशिकमध्ये ‘त्या’ वटवृक्षाच्या बुंध्याला मेणबत्ती प्रज्वलित करून वृक्षप्रेमींची श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 21:14 IST

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या सहाय्याने वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला आहे. वड प्रजातीच्या वृक्षांना उच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही पालिकेने अवैधरित्या हा वड जमिनदोस्त करुन न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे.

ठळक मुद्दे वडाचा डेरेदार वृक्ष जेसीबीने जमिनदोस्त केला. वटवृक्ष हा किमान दहा ते पंधरा वर्षे जुना

नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही नाशिक महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान शनिवारी येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाचा डेरेदार वृक्ष जेसीबीने जमिनदोस्त केला. या कारवाईच्या निषेधार्थ वृक्षप्रेमींनी रविवारी संध्याकाळी सदर ठिकाणी हजेरी लावून बुंध्यावर मेणबत्त्या प्रज्वलित करुन श्रध्दांजली दिली.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या सहाय्याने वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला आहे. वड प्रजातीच्या वृक्षांना उच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही पालिकेने अवैधरित्या हा वड जमिनदोस्त करुन न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. मानव उत्थान मंच व जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य जगबीर सिंग यांच्यासह भारती जाधव, प्रिती पारख आदि उपस्थित होते.

सदर वटवृक्ष हा वाहतूकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या वटवृक्षाच्या बाबतीत पालिकेने वृक्ष प्राधिकरण निर्णय समितीपुढे कुठलाही विषय मांडलेला नव्हता. एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. सदर वटवृक्ष हा जास्त जुना नव्हता मात्र किमान दहा ते पंधरा वर्षे जुना असावा असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. हा हिरवागार डेरेदार वृक्षाचा विस्तार होत असताना अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुखांनी आपल्या पथकाचा प्रताप झाकण्यासाठी थेट वडाच्या वाढत्या झाडाच्या मुळ्या कमकुवत झाल्या होत्या आणि तो उन्मळून पडणार असल्याचे भाकित करुन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका