शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या हल्ल्याचा मालेगाव, सटाणा, ओझरला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 00:18 IST

मालेगाव : भारत-चीनच्या चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले. त्या सर्व शहिदांना येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव शहराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड यांनी चीन हा फक्त भारताचाच नव्हे संपूर्ण विश्वाचा शत्रू झालेला आहे.

ठळक मुद्देप्रतीकात्मक पुतळ्याचे दहन : शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण; चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : भारत-चीनच्या चकमकीत भारताचे २० सैनिक शहीद झाले. त्या सर्व शहिदांना येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव शहराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड यांनी चीन हा फक्त भारताचाच नव्हे संपूर्ण विश्वाचा शत्रू झालेला आहे.आपण प्रत्यक्ष सीमा रेषेवर जाऊन जरी युद्ध करू शकत नसलो तरी अप्रत्यक्ष चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून या युद्धात आपण चिनी अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतो म्हणून आजपासून चीननिर्मित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.यावेळी नितीन पोफले, रविष मारू, जगदीश गोºर्हे यांची भाषणे झाली. यावेळी शहराध्यक्ष मदन गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष विवेक वारुले, कुशाभाऊ आहिरे, राजेंद्र शेलार, दिनेश साबणे, भरत बागुल, विजय भावसार, प्रकाश सुराणा, दीपक शिंदे, दुर्गेश कोते, विजय ऐथाल, युवराज मुन्ना आहिरे, दीपक जगताप, दिनेश अग्रवाल, राकेश शिंदे, जिभाऊ पाटील, सर्जेराव पवार, अभिषेक भावसार, श्रीकांत शेवाळे, किशोर गुप्ता, ललित चव्हाण, चेतन सूर्यवंशी, टूनम गायकवाड, पवन वारुळे, पवन पाटील, दर्शन गायकवाड, योगेश गायकवाड आदी उपस्थित होते.सटाण्यात शहीदांना श्रद्धांजलीसटाणा : चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी करून केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे वीस जवानशहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील ताहाराबाद नाक्यावर गुरुवारी (दि.१८) भाजपतर्फेचिनी ध्वज, चिनीवस्तू व चीनच्या पंतप्रधानांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.यानंतर शहीद जवानांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय देवरे यांच्या नेतृत्वाखाली येथील ताहाराबाद नाक्यावर आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनवणे, श्यामकांत लोखंडे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नीलेश पाकळे, नगरसेवक काका सोनवणे, महेश सोनवणे, जीवन सोनवणे, रुपाली पंडित, सरोज चंद्रात्रे, पंकज ततार, जगदीश मुंडावरे, किरण नांद्रे, संदीप पवार, मंगेश खैरनार, निर्मला भदाणे आदी उपस्थित होते.पाटणे येथे लडाख सीमेजवळ चीनकडून भ्याड हल्ला झाला. त्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा निषेध म्हणून बसस्थानकाजवळ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या व चीनच्या राष्ट्रध्वजाचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. पुष्पक पाटील, वैभव अहिरे, योगेश पाटील, दादू पगारे, यश खैरनार, महेश खैरनार, अमोल पगारे आदी युवकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मालेगाव येथे हातात चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकनारे संदेश घेऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सटाणा रोडवर ठिकठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळत चार-चारच्या गटाने चीनचा धिक्कार करीत निषेध प्रदर्शन केले. ओझर : चायनाचा वाढता उपद्रव आणि केलेल्या हल्ल्यामुळे ओझर येथील शिवसेनेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. चायनाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आपल्या बाजारातील चायना वस्तू न घेण्याचे आवाहन ओझर शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत चायना वस्तू जाळून त्याचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.व्यापाऱ्यांनीदेखील भारतात निर्मिती करण्यात अलेल्याच वस्तू विक्ती कराव्यात असे आवाहन प्रकाश महाले, नितीन काळे, प्रकाश कडाळे, प्रशांत पगार, वसंत भडके, स्वप्निल कदम, अनिल सोमसे, दीपक सोनार, आशिष शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :businessव्यवसायchinaचीन