शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:25 IST

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या हल्ल्याचा नशिकमध्येही इंडियन मेडिकर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १४) निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करतानाच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली.

ठळक मुद्देहल्लेखोरांवर कारवाईसाठी आयएमएचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकांकडून झालेल्या हल्ल्याचा नशिकमध्येही इंडियन मेडिकर असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. १४) निदर्शनांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे हल्लेखोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करतानाच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली.वैद्यकीय व्यावसायिकांसोबतच रुग्णालयांमधील डॉक्टरांवर होणाºया हल्ल्यांमुळे हिंसाचार वाढत असून, कोलकात्यात डॉ. परिभा मुखर्जी अशाच हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर देशभरात डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनात नाशिकच्या आयएमएने सहभाग घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. तसेच देशभरातील सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला असल्याने नाशिकमधील डॉक्टरांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आल्याचे आयएमएचे अध्यक्ष प्रशांत देवरे यांनी सांगितले. समाज स्वास्थ्याच्या हिताच्या दृष्टीने वैद्यकीय व्यावसायिकांची आणि रुग्णालयांची सुरक्षितता जपणे हे सरकारचे कर्तव्य असून, इंडियन मेडिकल असोसिएशन अशारुग्णांच्या जीवितास धोकाकेंद्र शासनाने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणाºया हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी मागणी आयएमएने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे रुग्णालयातील अन्य रुग्णही वेठीस धरले जातात. तसेच रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिक सातत्याने दहशतीखाली असल्याने त्यांची कार्यक्षमताही खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. कोणीही डॉक्टर अशा हिंसाचाराच्या भीतीने अत्यवस्थ रुग्ण दाखल करून घेण्यास पुढे येणार नाही. त्यातून रुग्णांच्या जीविताचा धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टर