शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी संरक्षित पेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 00:19 IST

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे जोखमीचे काम! अनेक ठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर बाधितावर उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एचएएलने एरोसेल बॉक्स तयार केले आहे. ही संरक्षित पेटी त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला उपलब्ध करून दिली आहे. उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांना ही पेटी उपयुक्त ठरणार असून, महापालिकेने अशा दहा बॉक्सची मागणी नोंदविली आहे.

ठळक मुद्देएचएएलचे संशोधन : नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात प्रयोग

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे जोखमीचे काम! अनेक ठिकाणी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर बाधितावर उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एचएएलने एरोसेल बॉक्स तयार केले आहे. ही संरक्षित पेटी त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाला उपलब्ध करून दिली आहे. उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांना ही पेटी उपयुक्त ठरणार असून, महापालिकेने अशा दहा बॉक्सची मागणी नोंदविली आहे.एचएएलने सामाजिक दायित्व निधीतून महापालिकेला या पेट्या देण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या कोरोना आजार जगभर चिंतेचा विषय ठरला आहे. त्यातून अपुºया वैद्यकीय उपकरणांची उणीव अधोरेखित झाली आहे. व्यक्तिगत सुरक्षा साधनांची गरज स्पष्ट झाल्यानंतर अनेक संस्था, उद्योजक आणि अभियंत्यांनी आता नवीन संशोधने सुरू केली आहेत. त्यात लढाऊ विमाने तयार करणाºया तसेच देखभाल दुरुस्ती करणाºया एचएएलनेदेखील पुढाकार घेतला आहे.कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीचा त्याच्यावर उपचार करणाºया वैद्यकीय कर्मचाºयांनादेखील संसर्ग होऊ शकण्याची भिती असते. त्यामुळे अशा वैद्यकीय कर्मचाºयांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान ऐरोनॉटिकल लि. अर्थात एचएएलच्या वैद्यकीय टीमचे नवे एरोसेलचे बॉक्स उपयुक्त ठरत आहेत. एचएएलने कोरोनाबाधित रुग्णांसाठी एक्रॉलिक मेटलपासून एरोसोल बॉक्स (संरक्षित पेटी) तयार केली असून त्यामुळे रुग्णांचा वैद्यकीय कर्मचाºयांशी थेट संबंध येऊ शकणार नाही. एचएएलने तयार केलेला पहिला बॉक्स महापालिकेला दिला असून, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचारीही सुरक्षित राहणार आहे....तर देशभरात वापर शक्यया पेटीतून औषधे देण्यासाठी तसेच व्हेंटिलेटर (जीवरक्षक प्रणाली) लावण्यासाठी व्यवस्था आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्याचा वापर देशभरात होण्याची शक्यता आहे. या पेटीमुळे वैद्यकीय सेवकांना संरक्षण मिळणार आहे.एचएएलने सदरची पेटी एक्रॉलिक मेटलपासून बनविली असून त्याला एक कॅबिनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या कॅबिनेटमधूनच रुग्णावर उपचार करता येणार आहे. बॉक्समुळे कोरोना संसर्गापासून सहजपणे बचाव करता येणार आहे. एचएएलने सामाजिक दायित्वातून आणखी बॉक्स महापालिकेसह जिल्हा रुग्णालयाला दिले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर एक बॉक्स सुपूर्द करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य