शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाकडून रस्ता सुरक्षेसह पर्यावरणाचीही रक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:29 IST

नाशिक : मुंबईहून नाशिक मार्गे जाणा-या परप्रांतीय कामगारांना मदतीचा हात म्हणून फुड पॅकेट आणि अन्य साहित्य दिले. परंतु त्यांनी ...

ठळक मुद्देसचिन जाधव यांचा उपक्रम टाकाऊतून टिकावू हे सूत्र

नाशिक: मुंबईहून नाशिक मार्गे जाणा-या परप्रांतीय कामगारांना मदतीचा हात म्हणून फुड पॅकेट आणि अन्य साहित्य दिले. परंतु त्यांनी त्यानंतर फेकून दिलेल्या प्लास्टीक पिशव्य आणि अन्य कच-याचा जागोजागी खच साचला. मात्र, त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून नाशिकचे एक निसर्गप्रेमी वाहतूक पोलीस सचिन जाधव यांनी टाकाऊतून टिकावू हे सूत्र अवलंबून या बाटल्यांमध्ये औषधी, वनस्पती, फुलझाडे फुलविली आहेत. त्यांच्या या उपक्र मातून त्यांनी ‘कोरोना’काळात रस्त्याची सुरक्षा आणि पर्यावरणाचीही रक्षा केली आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेची हिरवळ आता पोलीस स्टेशन, विविध कार्यालयात आणि महामार्गावर दिसणार आहे.लॉकडाउनमध्ये मुंबईकडून पायी निघालेल्या परप्रांतीयांनी वापरलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकिंगचा, प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा सर्वत्र पडलेला पाहून अनेकांना वाईट वाटले. मात्र महामार्गाची स्वच्छता करण्यासाठी कोणी पुढे आले नाही. मात्र याच कालावधीत महामार्गावर कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस सचिन जाधव यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी स्वयंस्फूर्तीने या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करून त्यात फुलझाडांसह, तुळशी, अडुळसा, अश्वगंधा, कोरफड अशा औषधी वनस्पती लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.त्यांच्या या पर्यावरणपूरक बागेतील ही फुलझाडे आणि औषधी वनस्पती नाशिकमधील विविध पोलीस चौक्या कार्यालये, महामार्गावर बहरलेल्या दिसणार आहेत. हे कार्य करीत असताना जाधव यांनी महामार्गावरील बॅरिकेड्सवरही पर्यावरण रक्षणाचे, जनजागृतीचे फलकही लावले. तसेच काही बाटल्यांमध्ये पाण्याची सोय केली असून, ते पक्ष्यांसाठी ठेवण्यात आले आहे. अनेक तहानलेले पक्षी या भांड्यातील पाणी पिऊन त्यांची तहान भागवत आहेत. पर्यावरणाशी नाते जोडणा-या सचिन जाधव यांनी टाकावूपासून टिकाऊचा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या उपक्र मातून कच-याची विल्हेवाट होणार आहेच, शिवाय नाशिक स्मार्ट सिटीलाही मोठा फायदा होणार आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जाधव यांच्या उपक्र माचे कौतुक केले आहे. नाशिकमधील विविध पोलीस चौक्या आणि हद्दीतील महामार्गावर ही रोपे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस