शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी वनसंरक्षकांना घेराव ; मासेमारी थांबविण्याची नेचर क्लबची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:15 IST

नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने येथील मासेमारी थांबविण्यात यावी तसेच अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी (दि.१२) मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. 

ठळक मुद्देनांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मासेमारीजगभरातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणीअभयारण्य वाचवण्यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिकचा वनसंरक्षकांना घेराव

नाशिक : नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने येथील मासेमारी थांबविण्यात यावी तसेच अभयारण्याचे नाशिकमधील कार्यालय नांदूरला स्थलांतरित करण्यात यावे, या मागणीसाठी नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे मंगळवारी (दि.१२) मुख्य वनसंरक्षकांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. नेचर क्लब ऑफ  नाशिकतर्फे नांदूरमधमेश्वर येथील मासेमारी थांबविण्यासोबतच, कार्यालय स्थलांतराच्या मागणीसह जखमी पक्ष्यांना अभयारण्यात उपचार मिळण्यासाठी उपचार केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पक्षी संरक्षण समिती स्थापन करावी, गाइड काम करणाऱ्या तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, पर्यटकांना विविध सुविधा मिळव्यात, तसेत अधिकाºयांना राजकीय नेत्यांच्या दबावातून मुक्त करण्यात यावे आदी मागण्यांसाठी संस्थेतर्फे वन्यजीव वनसंरक्षक अनिल अंजनकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पक्षिमित्र दिगंबर गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, डॉ. विक्रांत जाधव, प्रमिला पाटील, सीमा पाटील, भारती जाधव, किरण बेलेकर, योगेश कापसे, अमोल दराडे, प्रमोद फाल्गुने, सर्पमित्र मनीष गोडबोले, प्रमोद महानुभाव, गिरीश ताजने, लक्ष्मीकांत कोतकर, रोहित नाईक, भाऊसाहेब राजोळे, सागर बनकर आदींसह शहरातील वन्यजीव व पक्षिमित्र घेराव आंदोलनात सहभागी झाले होते.  

पक्ष्यांच्या मुखवट्यांसह आंदोलननाशिकमधील सर्व पक्षिमित्र, प्राणिमित्र, सर्पमित्र, वृक्षमित्र, पर्यावरणावर कार्य करणाऱ्या संस्था एकत्रित येऊन कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने मुख्य वनसंरक्षक नाशिक यांना घेराव घालून मृत पक्ष्यांसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कार्यवाई करण्याची मागणी केली. यावेळी  निसर्ग मित्रांनी पक्ष्यांचे मुखवटे परिधान केले होते. दरम्यान, वनाधिकाऱ्यानी पक्ष्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधितांवर कार्यवाही होणार असल्याचे सांगत पक्षी संवर्धन समिती स्थापन करण्याचेही आश्वासन दिले.   

टॅग्स :forestजंगलNashikनाशिकforest departmentवनविभागagitationआंदोलन