शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून देहविक्रयाचा अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:43 IST

विनयनगर येथील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला देहविक्रयचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यामधून देहविक्रयसाठी आणलेल्या १३ महिलांची सुटका केली तसेच अड्डा चालविणाऱ्या संशयित आंटी फिलोमिना शर्मा व तिचा साथीदार अर्जुनसिंग चौहान यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

ठळक मुद्दे सदनिकेतून कोलकात्याच्या १३ पीडित महिलांची सुटका

नाशिक : विनयनगर येथील एका अपार्टमेंटमधील सदनिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला देहविक्रयचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून उद्ध्वस्त केला. या ठिकाणाहून पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यामधून देहविक्रयसाठी आणलेल्या १३ महिलांची सुटका केली तसेच अड्डा चालविणाऱ्या संशयित आंटी फिलोमिना शर्मा व तिचा साथीदार अर्जुनसिंग चौहान यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित सराईत फिलोमिना शर्मा या महिलेने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी येथील प्रभूदेवा नावाच्या अपार्टमेंटमध्ये काही महिला व युवतींना राहण्याची व्यवस्था करुन देत त्यांच्याकडून बळजबरीने देहविक्रयचा व्यवसाय सुरु केलेला होता. विनयनगर भागातील भारत नगरसमोरील मोकळ्या मैदानामध्ये हा परिसर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या भागातील नागरिकांकडून सातत्याने पोलीस आयुक्तालयाला तक्रारी प्राप्त होत होत्या. यामुळे गुन्हे शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी मध्यवर्ती गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या संयुक्त पथकांना कारवाईचे आदेश दिले. यावेळी पथकाने प्रभूदेवा अपार्टमेंट गाठून तेथे एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यात बनावट ग्राहक पाठवून खात्री केली व सापळा रचला गेला. बनावट ग्राहकाने इशारा देताच दबा धरुन बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी आतमध्ये प्रवेश करत छापा टाकला. यावेळी घटनास्थळावर एकच पळापळ झाली. महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रथम संशयित फिलोमिना हिला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर, सचिन सावंत, विशेष शाखेच्या सहायक निरीक्षक माधवी वाघ, महिला पोलीस निलीमा निकम, उन्नती भावे आदींनी या कारवाईत सहभाग घेत तसेच देहविक्रयसाठी असलेल्या एकूण १३ पीडित महिलांना तसेच सहा संशयित ग्राहकांनाही त्वरित पोलीस वाहनात डांबले.शर्मासह चौहान याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने येत्या ३ तारखेपर्यंत दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित फिलोमिनाविरुद्ध यापूर्वीही देहविक्रय व्यवसाय चालविल्याबद्दल दोन गुन्हे दाखल आहेत.सापळा रचून पोलिसांचा छापामुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील या भागात काही वर्षांपासून सुरु असलेल्या या देहविक्रयच्या अड्डयावर कारवाई केली जात नव्हती. उपायुक्त चौगुले यांनी याप्रकरणी नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत मध्यवर्ती गुन्हे शाखा, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, मध्यवर्ती गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार करत त्यांना कारवाईचे आदेश दिले. या कारवाईपासून मुंबई नाका पोलिसांना काही अंतर लांब ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी