पालिकेच्या सुमारे सहाशे मिळकती नाममात्र भाड्याने विविध संस्थांना देण्यात आल्या असून, त्यासाठी नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव महापौरांनी तहकूब केला. आयुक्त संजीवकुमार उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला. तथापि, अशा प्रकारे नियमावली करण्याचा प्रस्ताव यापूर्वी सुमारे पाच ते सात वेळा तहकूब करण्यात आला असल्याने नगरसेवकांचीच याबाबत मानसिकता नसल्याचे दिसत आहे.
मिळकतींच्या भाडेवाढीचा प्रस्ताव पुन्हा तहकूब
By admin | Updated: July 18, 2014 00:33 IST