शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

दिव्यांगांसाठी मालमत्ता करात सवलतीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:39 IST

दिव्यांग व्यक्तींसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मांडण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी मालमत्ता करातही सवलत देण्याचा महापालिकेचा विचार असून, तसा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे.

नाशिक : दिव्यांग व्यक्तींसाठी पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव येत्या महासभेत मांडण्यात येणार आहे. याशिवाय दिव्यांगांसाठी मालमत्ता करातही सवलत देण्याचा महापालिकेचा विचार असून, तसा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि. २४) झालेल्या आढावा बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नियोजित प्रकल्पांना मार्चअखेर सुरुवात करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी खातेप्रमुखांना दिल्या.दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून महापालिकेने विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. गेल्या सहा महिन्यात झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी दिव्यांगांसाठी शहरातील मनपा शाळांमध्ये २३ ठिकाणी संसाधन केंद्र स्थापन करण्यात येणार असून, त्याबाबतची निविदाप्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. शिक्षण विभागाच्या वतीने अपंग खेळाडूंसाठी पॅरा आॅलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार आहे. फेबु्रवारीच्या दुसºया आठवड्यात या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी वैद्यकीय विभागाने सहाही विभागात फिरता दवाखाना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (दि.२६) प्रजासत्ताकदिनी महापौरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी सैनिकांप्रमाणेच दिव्यांगांनाही मालमत्ता करात सवलत देण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. महापालिकेमार्फत दिव्यांगांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून अपंगत्वाचे प्रमाणपत्रधारक दिव्यांगांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. तीन दिवसात १८०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी फेब्रुवारीत होणाºया महासभेत मांडला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.  दरम्यान दिव्यांगांसाठी राखीव निधी आणि अंदाजपत्रकात केलेली तरतूद मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी खातेप्रमुखांना दिल्या. प्रलंबित कामांनाही गती देण्याचे आदेशत्यांनी दिले.आॅडिओ लायब्ररी उभारणारशहरातील अंधबांधवांसाठी महापालिकेच्या वतीने आॅडिओ लायब्ररी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्युत विभागामार्फत नोंदणीकृत सामाजिक संस्था व सार्वजनिक वाचनालये यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संबंधित संस्था, वाचनालयांशी महापालिका करार करणार असून, मनपा खर्चाने आॅडिओ लायब्ररी उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी संबंधित संस्था व वाचनालयांना जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका