शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 15:38 IST

आरोग्य समितीची बैठक : ब्लॅकस्पॉटबाबत नागरिकांना पाठविणार पत्र

ठळक मुद्देसार्वजनिक शौचालयांतील १९२ सीटस्ची स्वच्छता मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यामार्फत व्यवस्थित केली जात नसल्याने खासगीकरणातून स्वच्छता करण्याचा प्रस्ताव गोदावरी नदी संवर्धनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याना तेथून काढून घेऊन त्यांच्या जागेवर आऊटसोर्सिंगने कर्मचारी नियुक्त करण्याचाही ठराव

नाशिक - महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता खासगीकरणातून करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीच्या सभेत संमत करण्यात आला. याचवेळी, शहरात कचऱ्याच्या ब्लॅकस्पॉटसंदर्भात त्या-त्या परिसरातील नागरिकांना पत्र पाठवून कचरा न टाकण्याचे आवाहन सभापतींमार्फत केले जाणार आहे.महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय साहाय्य समितीची सभा सभापती सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, सार्वजनिक शौचालयांतील १९२ सीटस्ची स्वच्छता मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यामार्फत व्यवस्थित केली जात नसल्याने खासगीकरणातून स्वच्छता करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. याचबरोबर, गोदावरी नदी संवर्धनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याना तेथून काढून घेऊन त्यांच्या जागेवर आऊटसोर्सिंगने कर्मचारी नियुक्त करण्याचाही ठराव संमत करण्यात आला. यावेळी, कच-याच्या ब्लॅक स्पॉटसंदर्भात चर्चा झाली. ब्लॅकस्पॉटची संख्या कमी करण्यासाठी पुन्हा प्रयत्न न झाल्याबद्दल सभापतींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे, ज्याठिकाणी ब्लॅकस्पॉट असतील तेथील परिसरातील नागरिकांना पत्र पाठवून आवाहन करण्यात येईल. त्यानंतरही ब्लॅकस्पॉट राहत असतील तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला. मोकळ्या भूखंडावर कचरा टाकणाºयांवरही कारवाई करण्यासंबंधीची माहिती आरोग्य विभागाकडून मागविली असता त्यांच्याकडून यादीच प्राप्त न झाल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. छाया देवांग यांनी सफाई कामगारांसाठी आवश्यक त्या ठिकाणी शेड बांधण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार, येत्या दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले. सफाई कर्मचा-यांच्या समान काम वाटपाबाबत नियोजन होत नसल्याबद्दल सदस्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. जुन्या नाशकात बाजारपेठांतील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडीची मागणी करण्यात आली तसेच गोदावरी, वाघाडी, वालदेवी, नासर्डी या नदी किनारी १५४ निर्माल्य कलश ठेवण्यासाठी निविदा मागविण्यात आल्याची माहिती संबंधित अधिका-यांनी दिली. डीपीरोडला धूर फवारणीसाठी मोठे हॅण्डमशीन तर गल्लीबोळात छोट्या मशिनचा वापर करण्याच्याही सूचना सभापतींनी दिल्या. सभेला उपसभापती योगेश शेवरे, सदस्य छाया देवांग, शांता हिरे, रुपाली निकुळे, अंबादास पगारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका