शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील पंचवटी भागासाठी काश्यपी धरणातून थेट पाईपलाईनचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 19:54 IST

स्थायी समिती सभापती : मनपाच्या अंदाजपत्रकात करणार तरतूद

ठळक मुद्देसन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांचे अंदाजपत्रक फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीला सादर होणार आहे येत्या अंदाजपत्रकातही उत्पन्नाची बाजू लक्षात घेता नवीन कामांना फारसा वाव नाही. त्यामुळे आयुक्तांच्या अंदाजपत्रकात खूप काही भर घातली जाणार नसल्याचेही सभापतींनी केले स्पष्ट

नाशिक - मुकणेपाठोपाठ आता गंगापूर धरण समुहातील काश्यपी या मध्यम प्रकल्पातून पंचवटी भागासाठी थेट पाईपलाइन टाकण्यासंबंधीचा प्रस्ताव असून त्यासाठी येत्या अंदाजपत्रकात तरतूद करण्याबरोबरच शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, येत्या अंदाजपत्रकात नव्या विकासकामांना फारसा वाव नसणार आहे. त्यामुळे, सुरू असलेले प्रकल्प पूर्णत्वाकडेच भर दिला जाणार असल्याचेही गांगुर्डे यांनी स्पष्ट केले आहे.महापालिका प्रशासनाकडून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांचे अंदाजपत्रक फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीला सादर होणार आहे. त्यानंतर, फेबु्रवारीच्या दुस-या किंवा तिस-या आठवड्यात महासभेला अंदाजपत्रक सादर केले जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली. गांगुर्डे यांनी सांगितले, चालू आर्थिक वर्षात प्रस्तावित करण्यात आलेली अनेक कामे निधीअभावी मार्गी लागू शकली नाहीत. येत्या अंदाजपत्रकातही उत्पन्नाची बाजू लक्षात घेता नवीन कामांना फारसा वाव नाही. त्यामुळे आयुक्तांच्या अंदाजपत्रकात खूप काही भर घातली जाणार नसल्याचेही सभापतींनी स्पष्ट केले. प्रामुख्याने, भविष्यातील शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने काश्यपी प्रकल्पातून पंचवटीतील माथ्यावरच्या भागासाठी थेट पाईपलाइन टाकण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याबरोबरच शासनाकडून निधीसाठी पाठपुरावा केला जाणार आहे. महापालिकेमार्फत मुकणे धरणातून थेट पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मुकणेपाठोपाठ किकवी धरणातून पाईपलाइन टाकण्याचा प्रस्ताव होता. परंतु, किकवीचा प्रस्ताव रेंगाळला असल्याने काश्यपीकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. काश्यपी या मध्यम प्रकल्पाची पाणीसाठवण क्षमता १८५२ दलघफू इतकी आहे. त्यातून प्रतिदिन १०० दसलक्षलिटर्स पाणी पुरवठा होईल यादृष्टीने नियोजन आहे. काश्यपीतील पाण्याचा पंचवटीतील मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव या भागाला लाभ होणार असल्याचेही गांगुर्डे यांनी सांगितले. या वर्षात अनेक प्रकल्पांसाठी शासनाकडून सुमारे ४०० ते ५०० कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षाही सभापती गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.नगरसेवकांना ५० लाखांचा निधीसन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांना प्रभागांच्या विकासासाठी प्रत्येकी ५० लाखांच्या निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिली. चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखालीच समितीने ४० लाख रुपये नगरसेवक निधी प्रस्तावित केला होता. पुढे महासभेने त्यात ३५ लाखांची भर घालत निधी ७५ लाखांवर नेला होता.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDamधरण