शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेत ७०० सफाई कामगारांचा आऊटसोर्सिंगद्वारे भरतीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 18:49 IST

उद्या महासभेत चर्चा : भरती प्रक्रियेला विरोध होण्याची शक्यता

ठळक मुद्देशहरात रस्त्यांची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छतेच्या कामासाठी मनपाच्या आस्थापना परिशिष्टावर १९९३ सफाई कामगारांची पदे मंजूर आहेत प्रत्यक्ष रस्त्यांवर १२०० ते १३०० सफाई कामगारच कार्यरत

नाशिक - महापालिकेत सफाई कामगारांची अपुरी संख्या लक्षात घेता प्रशासनाने आऊटसोर्सिंगद्वारे ७०० सफाई कामगारांची भरती करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि.१०) होणा-या महासभेत ठेवला आहे. सफाई कामगारांच्या आऊटसोर्सिंगला यापूर्वीही विरोध झालेला आहे. त्यामुळे महासभेत पुन्हा एकदा सदरचा प्रस्ताव फेटाळून लावण्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.शहरात रस्त्यांची दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छतेच्या कामासाठी मनपाच्या आस्थापना परिशिष्टावर १९९३ सफाई कामगारांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील सुमारे ५५० कामगार हे महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयात कामाच्या सोईने अन्य कामांसाठी जुंपले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष रस्त्यांवर १२०० ते १३०० सफाई कामगारच कार्यरत असतात. त्यातही अनेक सफाई कर्मचा-यांचे गैरहजेरीचे प्रमाण अधिक आहे. त्याचा प्रत्यय महापौरांसह पदाधिका-यांना पाहणी दौ-यात आलेला आहे. महासभेसह प्रभाग समित्यांच्या सभांमध्ये नेहमीच अपु-या सफाई कामगारांच्या प्रश्नाबाबत वादळी चर्चा होत आलेली आहे. त्यातून कामगार भरती करण्याची मागणीही वाढत आहे. परंतु, महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांहून अधिक असल्याने शासनाकडून भरतीला मान्यता मिळत नाही. त्यासाठी महापालिका प्रशासनाने शासनाच्या नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. शासनाने आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्याचे कळविले आहे. त्यानुसार, डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्त असताना त्यांनीही आऊटसोर्सिंगद्वारे सफाई कामगार भरतीचा प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. परंतु, महासभेने आऊटसोर्सिंगला विरोध दर्शवत मानधनावर किंवा रोजंदारीवर भरतीचा आग्रह धरला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा सफाई कामगारांचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला असताना प्रशासनाने बुधवारी (दि.१०) होणा-या महासभेत सफाई कामगार भरतीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोधकांकडून पुन्हा एकदा विरोध होण्याची शक्यता आहे.सत्ताधा-यांच्या भूमिकेकडे लक्षसफाई कामगारांचा प्रश्न जटील बनला असल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून आऊटसोर्सिंगद्वारे कामगार भरतीला हिरवा कंदील दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने वार्षिक २० कोटी ७९ लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव ठेवला असून ई-निविदा पद्धतीने मक्तेदारामार्फत सदर भरती करण्याचे प्रस्तावित आहे. दरम्यान, शिवसेनेने सदर प्रस्तावास विरोध करण्याची तयारी केली असताना सत्ताधारी भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष लागून असणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका