शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 20:35 IST

सेना नगरसेवकाची मागणी : कोट्यवधी रुपयांच्या बचतीचा दावा

ठळक मुद्देरस्ते तयार होऊनही पावसाळयानंतर अनेक रस्त्यांची चाळण होतेनवी मुंबई महापालिकेने रस्त्याच्या कामात तब्बल ४० कोटी रूपये वाचविले आहेत

नाशिक : देशातील विविध शहरांत रस्ते दुरुस्तीसाठी मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून कोट्यवधी रूपयांची बचत केली जात आहे. नाशिक महापालिकेनेही या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा वापर करावा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक प्रविण तिदमे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचा प्रस्तावही त्यांनी स्थायी समितीला पाठविला आहे.तिदमे यांनी निवेदनात म्हटले आहे, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत आणि दुर्दशेबाबत सतत ओरड होत असते. रस्त्यांच्या कामांवर मनपाचे कोट्यवधी रु पये खर्च होतात. रस्ते तयार होऊनही पावसाळयानंतर अनेक रस्त्यांची चाळण होते. पुन्हा दुरु स्तीच्या नावाखाली कोट्यवधी रु पये खर्च केला जातो. सध्या तर मनपा कामांसाठी सल्लागार नेमूनही पैसे खर्च करत आहे. नवी मुंबई महापालिकेने रस्त्याच्या कामात तब्बल ४० कोटी रूपये वाचविले आहेत. मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करीत पालिकेने पाम बीच रस्त्याचे काम केले आहे. सदर रस्ता उखडून परत नवीन करायला ८ ते ९ महिन्यांचा कालावधी गेला असता. मात्र केवळ २ महिन्यात पालिकेने हे काम केले असून त्यामुळे रहदारीला कोणत्याच प्रकारचा खोळंबा आला नाही. सदर तंत्रज्ञान भारतात नवी मुंबई, दिल्ली सारख्या अनेक शहरांत वापरण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेकडून मायक्रो सर्फेसिंग टेक्नॉलॉजीची नाशिक महापालिकेने माहिती घेऊन अभ्यास करावा आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढे रस्ते दुरु स्तींवर होणा-या खर्चात कोट्यवधीची बचत करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रविणतिदमे यांनी केली आहे. प्रविण तिदमे यांनी स्थायी समितीलाही याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैशांची बचत तर होईलच शिवाय रस्त्यांचे आयुर्मान वाढणार आहे. बचतीच्या पैशांतून अधिक रस्त्यांची कामे होतील, असा दावाही तिदमे यांनी केला आहे.१९ कोटींचे डांबरी रस्ते दुरुस्तीचे प्रस्तावमहापालिकेच्या स्थायी समितीची सभा येत्या सोमवारी (दि.२२) होणार असून यावेळी सहाही विभागातील डांबरी रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी १९ कोटी १२ लाख रुपये खर्चाचे प्रस्ताव बांधकाम विभागाने मंजुरीसाठी ठेवले आहेत. सदर प्रस्तावाच्यावेळी तिदमे यांनी मांडलेल्या सूचनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीकडून त्याबाबत कितपत गांभीर्याने घेतले जाते, याकडे आता लक्ष लागून असणार आहे.मायक्रो सर्फेसिंगचे फायदेग्रीट, सिमेंट, लहान खडीचा वापर करुन मशीनमध्ये मिश्रण केले जाते. हे मिश्रण थंड करु न परत त्याचा पातळ थर मशीनच्या साहाय्याने रस्त्यावर पसरवला जातो. सदर मिश्रण डांबराप्रमाणे गरम करावे लागत नसल्याने वायू प्रदूषण होत नाही. रस्त्यावर ओतल्यावर ते अर्धा तासात सुकते. त्यावरु न लगेच वाहतूक चालू केली जात असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न येत नाही. पावसाळ्यात पाणी रस्त्यात न मुरल्याने त्याला खड्डे पडण्याची शक्यता कमी होते. यात डांबराचे प्रमाण कमी आहे. तसेच, यामुळे रस्त्यावर वाहने घसरु न पडून अपघाताची शक्यता कमी होते.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका