शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:18 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊन थेट जमीन खरेदी करणाऱ्या प्रशासनाने आजवर ८० टक्केजमीन ताब्यात घेतली असली तरी, उर्वरित २० टक्के जागा ताब्यात मिळत नसल्याने त्यासाठी सक्तीचे भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊन थेट जमीन खरेदी करणाऱ्या प्रशासनाने आजवर ८० टक्केजमीन ताब्यात घेतली असली तरी, उर्वरित २० टक्के जागा ताब्यात मिळत नसल्याने त्यासाठी सक्तीचे भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाला पाठविण्यात आला आहे. शासनाने भूसंपादनाची अंतिम नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर शेतकºयांना वाढीव मोबदला देऊन थेट जमीन खरेदीचा मार्ग बंद होणार आहे.  सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतून शंभर किलोमीटर मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी जागामालक शेतकºयांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला जाहीर करण्यात येऊन ८५७ हेक्टर जमीन थेट खरेदीने घेण्यात आली आहे. मार्गावर १५७ हेक्टर जमीन शासकीय असल्याने त्याचा ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या ताब्यात असलेल्या ८० टक्के जमिनी व्यतिरिक्त उर्वरित २० टक्के जमीन भाऊबंदकी तसेच न्यायालयीन वादात अडकली आहे. महामार्गाचे काम सुरू करण्यासाठी सरकारची घाई सुरू असून, अधिकाºयांनी जमीनमालकांची हरतºहेची समजूत घालून त्यांना राजी करण्याचे प्रयत्न केले, परंतु आता सक्तीच्या भूसंपादनाशिवाय काहीच पर्याय नसल्याने शासनाने मे महिन्यात तालुक्यांसाठी प्रारूप अधिसूचना जारी केली होती व त्यावर जमीनमालकांच्या हरकतींसाठी २१ दिवस मुदत दिली होती. उपविभागीय अधिकाºयांनी या हरकतींची सुनावणी पूर्ण केली असून, त्याबाबतचा अहवाल तसेच भूसंपादन कायद्यान्वये जमीन संपादनासाठी प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्टÑ राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठविला आहे. आता हा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी दाखल होईल. पुढच्या आठवड्यात शासनाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता असून, ती प्रसिद्ध झाल्यास पाच पट मोबदला देऊन थेट खरेदीचा मार्ग बंद होणार आहे. भूसंपादन अधिकाºयांकडून जमिनीच्या मोबदल्याचे निवाडे जाहीर करून भूसंपादन केले जाणार आहे.शिवड्याची मोजणी पूर्णशिवडे ग्रामस्थांनी या महामार्गासाठी सुरुवातीपासून विरोध करून त्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने याचिका फेटाळल्याने नागरिकांचाही विरोध मावळला असून, शिवड्याची संयुक्त जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. शिवाय त्यातील बहुतांशी जागामालकांनी संमतीपत्रेही दिल्यामुळे त्यांची जमीन थेट खरेदीची प्रक्रिया राबविली जात आहे.सक्तीचे संपादनअंतिम अधिसूचना प्रसिद्ध झाल्यास सिन्नर तालुक्यातील १३६.५९ हेक्टर जमिनीसाठी २५ गावांत सक्तीचे संपादन होणार आहे. त्यात आगासखिंड, बेलू, मºहळ, वारेगाव, कोनांबे, खंबाळे, फुलेनगर, धोंडवीरनगर, जे. पी. नगर, पांढुर्ली, वावी, सावतामाळीनगर, दुशिंगवाडी, माळढोण, मºहळ बु., पाथरे, पाटोळे, डुबेरे, सायाळे, बोरखिंड, गोरवड या गावांचा समावेश असून, इगतपुरी तालुक्यातील गोंदे या एकमेव गावाचा त्यात समावेश आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय