शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

साठ एकर जागेसाठी महासभेवर प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:30 IST

मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाशिकमध्ये केलेल्या आंंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी साठ एकर भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते.

नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलकांनी नाशिकमध्ये केलेल्या आंंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी साठ एकर भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. सदरची जागा म्हसरूळ शिवारातील सर्व्हे नंबर २५७ व २५९ अशी असून, महापालिकेच्या उपयोगासाठी असलेली ही जागा सध्या महापालिकेच्या ताब्यात आहे. ही जागा सकल मराठा समाजाला देण्यासाठी महासभेवर रीतसर प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. मराठा आंदोलकांनी आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर आंदोलन केले त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या मालकीची जागा समाजाला वसतिगृहासाठी देण्याचे जाहीर केले. अर्थात, तब्बल साठ एकर क्षेत्राचा इतका मोठा भूखंड महापालिकेकडे आहे काय आणि तो मुळातच सुस्थितीत आहे काय? अशा अनेक प्रकारच्या शंका व्यक्त केल्या गेल्या. विशेष म्हणजे घोषणे इतकेच प्रत्यक्ष विकास आराखड्याविषयी नगररचना विभागाने अनभिज्ञता दर्शविली. सदरच्या भूखंडांचा सर्व्हे नंबर माहिती असल्याशिवाय खरोखरीच अशाप्रकारची जागा आहे काय आणि ती महापालिकेच्या ताब्यात आहे काय याबाबत माहिती देता येणार नसल्याचे या सांगत या विभागाने कानावर हात ठेवले.  महापौर रंजना भानसी यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळच्या पुढे आणि आरोग्य विद्यापीठाला जोडणारा हा साठ एकरचा भूखंड असून, त्याचा सर्व्हे क्रमांक २५७ व २५९ आहे. गायरान ट्रस्टची जागा त्यालगत आहे. महापालिकेच्या जागेपैकी म्हसोबावाडी येथे पाच ते सहा एकर क्षेत्रावर झोपडपट्ट्या असून, यापूर्वी अनेकदा हटवूनही त्या याच जागेवर वसविल्या जात आहे. अर्थात अतिक्रमणे हटवता येतील. तथापि, मराठा समाजाला वसतिगृहासाठी जागा देण्याबाबत धोरणात्मक निर्णय महासभेत मांडण्यात येणार आहे. याच भागाचे नगरसेवक अरुण पवार हे सभेत ठराव मांडतील. तसेच तो मंजूर झाल्यानंतर रितसर कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.आरोग्य विद्यापीठानेही मागितला भूखंडयाच भागात महापालिकडे महाराष्ट आरोग्य विद्यापीठानेदेखील एका भूखंडाची मागणी केली आहे. विद्यापीठाच्या शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भूखंडाची मागणी करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. अर्थात, महापालिकेने संबंधितांना अद्याप भूखंड दिलेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका