शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी, सिडकोचा घंटागाडी ठेका रद्दचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:36 IST

सिडको आणि पंचवटी विभागातील घंटागाडीचा ठेका घेणाºया जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराला कामकाजात सुधारणा करण्याबाबत जबर दंड ठोठावतानाच वारंवार नोटिसा बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रशासनाकडून सदर ठेकाच रद्द करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या असून, तसा प्रस्ताव आयुक्तांपुढे ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आयुक्तांनी याबाबत अतिरिक्त आयुक्तांसह आरोग्याधिकारी यांच्याकडून माहिती मागविली आहे.

नाशिक : सिडको आणि पंचवटी विभागातील घंटागाडीचा ठेका घेणाºया जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराला कामकाजात सुधारणा करण्याबाबत जबर दंड ठोठावतानाच वारंवार नोटिसा बजावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर प्रशासनाकडून सदर ठेकाच रद्द करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू झाल्या असून, तसा प्रस्ताव आयुक्तांपुढे ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आयुक्तांनी याबाबत अतिरिक्त आयुक्तांसह आरोग्याधिकारी यांच्याकडून माहिती मागविली आहे.  महापालिकेने डिसेंबर २०१६ पासून नव्याने घंटागाडीचा ठेका दिला आहे. ठेकेदारांना नवीन घंटागाड्या चालविणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार, जवळपास सर्वच ठेकेदारांनी नवीन घंटागाड्या रस्त्यावर आणल्या आहेत. घंटागाड्यांबाबत सर्वाधिक तक्रारी या पंचवटी व सिडको विभागातून येत असल्याने महापालिकेने दोन्ही ठिकाणी ठेका घेणाºया जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराला आतापर्यंत असमाधानकारक कामकाजाबद्दल आठ वेळा नोटिसा बजावल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. याशिवाय, सदर ठेकेदाराकडून १ कोटी ७० लाख १० हजार रुपये दंडाचीही रक्कम वसूल होणे बाकी आहे.  सदर ठेक्याबद्दल महापौरांनीही वेळोवेळी नाराजी व्यक्त करत ठेकेदारासह आरोग्याधिकाºयांनाही सुनावले आहे. परंतु कामकाजात सुधारणा न होता दिवसागणिक तक्रारींमध्ये भरच पडताना दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने सदर ठेकेदाराचा घंटागाडीचा ठेकाच रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तो आयुक्तांपुढे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीही सदर ठेकेदाराबाबत माहिती मागविली आहे. वाढत्या तक्रारींचा परिणाम ठेकेदार हा सत्ताधारी भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधाºयांकडून त्याला अभय मिळत असल्याची तक्रार घंटागाडी कर्मचाºयांच्या श्रमिक संघटनेने यापूर्वीच केली आहे.   सदर ठेकेदाराकडून कर्मचाºयांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी कर्मचाºयांनी केल्या होत्या. वाढत्या तक्रारींमुळेच प्रशासन ठेकाच रद्द करण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडको