शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
3
बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही
4
Shoaib Malik शी घटस्फोटानंतर Sania Mirza ने बदलली घरावरील 'नेम प्लेट'; स्वत:सोबत जोडले एका खास व्यक्तिचे नाव
5
तब्येत बरी नसतानाही IPL मॅचनंतर शाहरुखची 'ती' कृती जिंकतेय चाहत्यांचं मन; Video व्हायरल
6
Gold-Silver Price: रिटर्न देण्याच्या बाबतीत चांदीनं सोन्याला टाकलं मागे, पाहा किती झाली किंमत?
7
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी ज्यांची इच्छा ते उत्साहाने करताहेत मतदान! - पुष्करसिंह धामी
8
"मला iPhone घेण्याची ऐपत नाही..."; लेकीनं बापाला इतकं सुनावलं, रस्त्यावरच गुडघे टेकले
9
प्रज्वल रेवण्णांच्या अटकेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पीएम मोदींना पत्र लिहिलं; केली मोठी मागणी
10
षडयंत्र, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे...; बांग्लादेशी खासदाराच्या मृत्यूचं गूढ कायम
11
“केजरीवाल यांनी कठोर कारवाई करुन न्याय द्यावा”; निर्भयाच्या आईचे स्वाती मालिवाल यांना समर्थन
12
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला न विसरता करा पिंपळाची पूजा; जाणून घ्या कारण!
13
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
14
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
15
Success Story: वडील शेतकरी, आई चालवायची अंगणवाडी केंद्र; मुलानं उभं केलं ₹९७३ कोटींचं साम्राज्य
16
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
17
Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या विचारातून परिस्थितीचा सामना करायला शिका!
18
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
19
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
20
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 8:01 PM

महिला व बाल कल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील मुलींना संगणक एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जात असून, त्यासाठी किती प्रस्ताव दाखल झाले याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी बºयाच प्रकल्पांनी अद्याप लाभार्थ्यांचा प्रस्तावच सादर केलेले नसल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देमहिला बाल कल्याण समिती : राजशिष्टाचाराचे करावे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महिला व बाल कल्याण विभागामार्फत योजना राबविल्या जात असताना त्यासाठी लाभार्थी निश्चित करण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वेळोवेळी दिलेल्या असतानाही प्रकल्प अधिका-यांकडून प्रस्ताव सादर करण्यात चालढकलपणा केला जात असल्याचे पाहून प्रस्ताव सादर न करणा-या अधिका-यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी दिल्या आहेत.

शुक्रवारी महिला व बाल कल्याण समितीची मासिक सभा खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात महिला व बाल कल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील मुलींना संगणक एमएससीआयटी प्रशिक्षण देण्याची योजना राबविली जात असून, त्यासाठी किती प्रस्ताव दाखल झाले याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ब-याच प्रकल्पांनी अद्याप लाभार्थ्यांचा प्रस्तावच सादर केलेले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे निधी खर्च न होता, अखर्चित राहतो. परिणामी विभागाची नाहक बदनामी होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली. त्याची दखल घेत ज्या प्रकल्पांनी लाभार्थी प्रस्ताव सादर केलेले नाहीत किंवा कमी केले आहेत, अशा बाल विकास प्रकल्प अधिका-यांच्या विरुद्ध प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खोसकर यांनी दिल्या. त्याचप्रमाणे अंगणवाडी व शाळा प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्यांना पाचारण करण्यात यावे असे मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सूचना असतानाही चांदवड तालुक्यात अंगणवाडी प्रवेशाच्या दिवशी बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांनी निमंत्रित केले नसल्याची तक्रार वडाळीभोई गटाच्या सदस्य कविता धाकराव यांनी बैठकीत केली. त्याची दखल घेऊन संबंधित पर्यवेक्षिका व बाल विकास प्रकल्प अधिकाºयांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या स्वाक्षरीने कारणे दाखवा नोटीस देण्याचे ठरविण्यात आले. लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपमान सहन केला जाणार नसल्याचेही खोसकर यांनी अधिकाºयांना सांगितले. या बैठकीस कविता धाकराव, रेखा पार, गणेश अहिरे, बाल विकास अधिकारी दत्तात्रय मुंडे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी रवींद्र चौधरी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद