शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मालमत्ता करात १ एप्रिलपासून वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:34 IST

महापालिका : १८ टक्के दरवाढीने होणार वसुली

ठळक मुद्देसुधारित दरानेच मिळकतधारकांना घरपट्टीची बिले पाठविली जाणार आहेत

नाशिक : महापालिकेने मालमत्ता करात १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी येत्या १ एप्रिल २०१८ पासून करण्यात येणार असून, सुधारित दरानेच मिळकतधारकांना घरपट्टीची बिले पाठविली जाणार आहेत. दरम्यान, महापालिकेने चालू आर्थिक वर्षात २५३ कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवल्याने थकबाकीदारांवर करडी नजर राहणार आहे.महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीने महासभेकडे पाठविलेल्या प्रस्तावात सुधारणा करत भांडवली मूल्यावर आधारित ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत घरपट्टी दरात वाढ सुचविली होती. परंतु, महासभेने आयुक्तांचा प्रस्ताव धुडकावून लावत भाडेमूल्यावर आधारित वसुलीला मंजुरी दिली होती. दरम्यान, घरपट्टी वाढीविरोधात राजकीय पक्षांनी आंदोलने केली. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला एक पाऊल मागे घेणे भाग पडले आणि स्थायी समितीचाच ठराव मान्य करत १८ टक्के दरवाढीला मान्यता दिली. त्यानुसार सर्वसाधारण करात ५ टक्के, सर्वसाधारण स्वच्छता करात ३ टक्के, जललाभ करात २ टक्के, मलनिस्सारण लाभकरात ५ टक्के, पथकरात २ टक्के तर मनपा शिक्षण करात १ टक्के याप्रमाणे १८ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. या सुधारित दरानेच येत्या १ एप्रिलपासून घरपट्टीची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यानुसार बिले पाठविली जाणार आहेत. महापालिकेच्या वतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांसाठी सवलत योजना लागू केली आहे. यंदाही ही सवलत राहणार असून, सुधारित दराने नागरिकांना बिले अदा करावी लागणार आहेत.२५३ कोटींचे उद्दिष्टआयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रकात घरपट्टी वसुलीचे २५३ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ११४ कोटींवर उत्पन्न अपेक्षित मानले जात आहे. यंदा मात्र, गतवर्षाच्या तुलनेत १३९.९७ कोटी रुपये वाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे. त्यामुळे साहजिकच थकबाकीदारांविरुद्ध महापालिकेने कठोर मोहीम राबविली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर