शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रख्यात उर्दू शायर गुलाम अहमद जोया यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 02:20 IST

शहरातील प्रख्यात उर्दू शायर जे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला परिचित होते असे गुलाम अहमद इब्राहिम कोकणी उर्फ ''जोया'' यांचे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी जुने नाशिक येथे सोमवारी (दि.21) संध्याकाळी सात वाजता निधन झाले. चौक मंडई येथील पीरमोहना कबरस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवाचे रात्री साडेदहा वाजता दफन करण्यात आले. जोया यांच्या निधनाने  उर्दू साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील उर्दू शायरवर्गाने जोया यांच्या रूपाने एक दिग्गज असा शायरीमधील ''उस्ताद'' गमावला.

नाशिक :  शहरातील प्रख्यात उर्दू शायर जे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला परिचित होते असे गुलाम अहमद इब्राहिम कोकणी उर्फ ''जोया'' यांचे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी जुने नाशिक येथे सोमवारी (दि.21) संध्याकाळी सात वाजता निधन झाले. चौक मंडई येथील पीरमोहना कबरस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवाचे रात्री साडेदहा वाजता दफन करण्यात आले. जोया यांच्या निधनाने  उर्दू साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील उर्दू शायरवर्गाने जोया यांच्या रूपाने एक दिग्गज असा शायरीमधील ''उस्ताद'' गमावला.

 

नाशिक जे एकेकाळी गुलशनाबाद म्हणून ओळखले जात असे. गोदाकाठी उर्दू शायरीचे बीजारोपणामध्ये जोया यांचा मोठा वाटा राहिला आहे. दिवंगत उर्दू शायर आदम मुल्ला आणि जोया यांची जोडीने उर्दू शायरीला शहरासह जिल्ह्यात वाढविले. त्यांनी  मित्रांना समर्पित केलेले ''रेंगते लमहें'' आणि 1998साली प्रकाशित ''देर सवेर'' हे दोन्ही काव्यसंग्रह फार लोकप्रिय झाले.

 

जोया हे त्यांचे शयरीमधील नाव होते. त्याचा अर्थ ''शोधक'' असा होतो. वसंत पोतदार यांनी त्यांच्या रेंगते लमहें काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर ''सत्यशोधक कवी'' असा उल्लेख केलेला आढळतो. त्यांच्या शायरी चे वैशिष्ट्य म्हणजे सोपी सहज आणि सरळ भाषा. शहरासह जिल्ह्यात उर्दू शाहिरांची पिढी घडविणारे उस्ताद म्हणून गुलाम अहमद सोया परिचित होते. सार्वजनिक वाचनालायकडून 1998साली प्रभाकर वैद्य पुरस्कार तसेच 2005साली महापौर गौरव पुरस्काराने जोया यांना सन्मानित करण्यात आले होते. ते नॅशनल उर्दू शाळेचे व एच.पी.टी महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होत. 

 

जोया यांच्या पश्चात एक मुलगा,  तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

शहरासह जिल्ह्यातील उर्दू शायर त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू