शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:07 IST

गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या सप्तशृंगगडावरील कोट्यवधी खर्चाची फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ४ मार्च रोजी होणारा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्याने आता फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून काम सुरू असलेल्या सप्तशृंगगडावरील कोट्यवधी खर्चाची फ्यूनिक्युलर ट्रॉली सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ४ मार्च रोजी होणारा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्याने आता फ्यूनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. दुसरीकडे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सप्तशृंगगडावर काही कामे अद्यापही अपूर्ण असल्याने ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अर्धशक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. याठिकाणी चैत्र तसेच नवरात्रोत्सवात यात्राही भरत असते. डोंगरावर स्वयंभू असलेल्या देवीच्या दर्शनास जाण्यासाठी सुमारे ५६१ पायºयांचा वापर करावा लागतो. त्यामुळे अपंग, वृद्ध, लहान बालकांना दर्शन घेणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात पर्यटनमंत्री असलेले छगन भुजबळ यांनी फ्यूनिक्युलर ट्रॉली बनविण्याचे कंत्राट दिले होते. बीओटी तत्त्वावर व परदेशाच्या धर्तीवर जवळपास दोन वर्षे या ट्रॉलीचे काम सुरू होते. अवघ्या तीन मिनिटात दर्शन रांगेपर्यंत पोहोचविणारी व एकाच वेळी ६० व्यक्तींची वाहतूक ट्रॉलीच्या माध्यमातून होणार आहे. तासाला १२०० भाविकांना दर्शन घडवून पुन्हा गडावरून खाली परत आणणारी ही ट्रॉली भारतात पहिलीच असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मध्यंतरी या ट्रॉलीची क्षमता व तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री करण्यासाठी परदेशी कंपनीच्या पथकाने पाहणीही केली. त्यामुळे ट्रॉलीचे काम पूर्ण झाले असल्याने ठेकेदार सुयोग बक्षानी फ्यूनिक्युलर ट्रॉली प्रा. लि. या कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ट्रॉलीचे लोकार्पण व्हावे अशी इच्छा प्रदर्शित करून तसे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते व मुख्यमंत्र्यांनीही त्यास अनुकूलता दर्शवून जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला होता.त्यादृष्टीने मंगळवारी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निरोध प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी गडावर भेट देऊन फ्यूनिक्युलर ट्रॉलीची चाचणीही घेतली होती. प्रत्यक्ष मंदिराच्या गाभाºयाला भेट देऊन भाविकांना ये-जा करण्यासाठी येणाºया अडचणींचा विचार करता काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत, तर आपत्ती व्यवस्थापन विभागानेदेखील येत्या दोन दिवसांत अहवाल देण्याची तयारी दर्शविली. परंतु मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित दौरा तूर्त पुढे ढकलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्याने ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरNashikनाशिक