शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

गेट बसविण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावला

By admin | Updated: September 1, 2015 22:29 IST

वाकी खापरी धरण : पुनर्वसन करण्याच्या भूमिकेवर धरणग्रस्त ठाम

गेट बसविण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावलावाकी खापरी धरण : पुनर्वसन करण्याच्या भूमिकेवर धरणग्रस्त ठामघोटी : इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणासाठी शासनाने संपादित केलेल्या शेतजमिनी, घरांचे पेमेंट आणि पुनर्वसन प्रलंबित असताना या प्रकल्पग्रस्तांचा कडवा विरोध झुगारून या धरणात पाण्याचा साठा करण्यासाठी गेट बसविण्याचा प्रयत्न संतप्त प्रकल्पग्रस्तांनी तिसऱ्यांदा उधळून लावला. मंगळवारी (दि.१) धरणग्रस्तांनी मनसेच्या उपजिल्हाप्रमुख रतनकुमार इचम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.घोटी-वैतरणा रस्त्यावर कोरपगाव शिवारात असलेल्या वाकी खापरी धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या व प्रलंबित प्रश्न धरणाचे काम पूर्ण होत आलेले असताना शासनाने पुनर्वसन पूर्ण न केल्याने धरणग्रस्त संतप्त झाले आहेत. यात धरणासाठी संपादित केलेल्या चार गावांचे अद्यापही पुनर्वसन न केल्याने या धरणग्रस्तांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाने या गावांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी सातत्याने होत असताना या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने धरणग्रस्तात संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, शासनाकडून या धरणावर पाणी साठविण्यासाठी टाकण्यात येणारे गेट बसविण्याचा प्रयत्न आजही होणार असल्याची कुणकुण धरणग्रस्तांना लागल्याने संतप्त धरणग्रस्तांनी मंगळवारी तिसऱ्यांदा हा प्रयत्न उधळून लावला. या धरणात या वर्षापासून एकहजार द.ल.घ.फू. पाणीसाठा करण्याचे शासन विचाराधीन आहे; मात्र जोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी साठविण्यासाठी गेट बसवू देणार नाही, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.घोटी-वैतरणा रस्त्यावर कोरपगाव शिवारात गेल्या पंधरा वर्षांपासून वाकी खापरी धरणाचे काम होत असून, आरंभीपासूनच शासनाने या धरणग्रस्तांच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने या धरणग्रस्तांनी धरणाचे काम अनेकदा बंद पाडले आहे. या बाबीची दखल घेत केवळ आश्वासने देऊन व वेळप्रसंगी पोलीस बळाचा वापर करीत धरणाचे काम करण्यात येत होते. दरम्यान, विद्यमान स्थितीत या धरणाचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून केवळ वीस टक्के काम बाकी आहे. काम पूर्णत्वास येऊनही अद्यापही संपादित केलेल्या वाळविहीर,भावली,पिंपळगाव भटाटा, व कोरपगाव या गावांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, यावर्षी धरणाचे काम पूर्ण होऊन पाणी साठवले जाईल. परिणामी या चार गावांच्या धरणग्रस्तांना निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे या धरणग्रस्तांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. धरणासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित केल्या असून या जमिनीचा अद्यापही मोबदला देण्यात आला नाही. जिल्हा न्यायालयाने या प्रकल्पग्रस्तांना वाढीव नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असताना अद्यापही भरपाई देण्यात आली नाही, उपसा सिंचन योजना राबविण्यात यावी, धरणग्रस्तांचे दाखले त्वरित देण्यात यावे, धरणग्रस्तांना पाणी उचलण्याची परवानगी व शासकीय, निमशासकीय पातळीवर नोकऱ्यांसाठी प्राधान्य द्यावे तसेच प्रकल्पग्रस्त घरमालकांना घरे बांधण्यासाठी मोफत भूखंड व सानुग्रह अनुदान देण्यात यावे, खास बाब म्हणून मंजूर केलेल्या भावली बुद्रुकच्या पुनर्वसनाची कार्यवाही तातडीने करा आदि मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत.दरम्यान मंगळवारी (दि.१) वाकी खापरी धरणावर धरणग्रस्तांचा विरोध डावलून गेट बसविणार असल्याची माहिती धरणग्रस्तांना मिळाली, यानुसार सकाळी या गेटची सामग्री या धरणावर आली असता जमा झालेल्या धरणग्रस्तांनी गेट बसविण्यास कडवा विरोध करीत आम्ही गेट बसवू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. सहायक अभियंता हरिभाऊ गिते यांना घेराव घातला. दरम्यान, या मागण्या पूर्ण न झाल्यास सदर धरणात पाण्याचा एक थेंबही साठू देणार नाही तसेच सदरचे गेट उभारणीचे काम करू देणार नाही, असा इशारा कृती समितीचे रतनकुमार इचम यांच्यासह पंचायत समिती सदस्य लहानू हिंदोळे, प्रभाकर इचम, रावजी नाडेकर, काशिनाथ कोकणे, श्रावण तेलम, रामचंद्र पाचारणे, लहानू गायकवाड, चंदर पथवे, कचरू शेळके, कारभारी गायकवाड, देवीदास हिंदोळे, कचरू इचम, शिवाजी कोकणे, मीराबाई पाचरणे, हिराबाई पाचरणे आदिंसह सहायक अभियंता हरिभाऊ गिते, ठेकेदार पुसदकर आदि उपस्थित होते.धरणाचे गेट टाकले तर धरणात होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे भावली गावठाणाचे कोणतेही नुकसान होणार नाही. गावांचे पुनवर्सन झाल्यानंतर शासनाने विशेष बाब म्हणून भावली बुद्रुक गावाचे पुनवर्सन करणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी गेट टाकणे कामी सहकार्य करावे. धरणाचे गेट टाकले तर धरणात एक टीएमसी पाणीसाठा तयार होऊन उन्हाळ्यात शेती व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. या धरणाला गेट लावण्याचे केवळ विचाराधीन असून प्रकल्पग्रस्तांची मानसिकता निर्माण झाल्यानंतर हे गेट बसविण्यात येईल.- हरिभाऊ गिते, सहायक अभियंता