शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मातोरी अत्याचाराचा कृती समितीकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:55 IST

मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली

ठळक मुद्देअत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी तसेच त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावीनैताळे येथील चिमकुलीवर बलात्कार करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी

नाशिक : मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे शुक्रवारी (दि.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. तसेच विविध घोषणा देत या प्रकरणातील सर्व दोषी व्यक्तिंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.        मातोरी येथे एका फार्महाऊसवर वाढदिवसासाठी डिजे वाजविण्यासाठी गेलेल्या तरुणांवर तेथील काही नराधमांनी त्यांना अमानुष मारहान करुन त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केला. डीजेवर काम करणाºया तरुणांनी रात्री १० नंतर डिजे वाजविण्यास नकार दिल्याने तसेच इतर काही कारणांमुळे मद्यधुंद असलेल्या या नराधमांनी कायद्याचे उल्लंघन करत हवेत गोळीबार करुन त्यांना धमकाविण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना रात्रभर अमानुष मारहान करुन जातीयवादी छळवणुक केली. त्यामुळे या नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी तसेच त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, तसेच गुन्हेगारांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, बंदुकीचा वापर केल्यामुळे तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, तसेच हे प्रकरण सी.बी. आय कडे सोपविण्यात यावे, पिडीतांना कायमस्वरुपी पोलिस संरक्षण देण्यात यावे, तसेच नैताळे येथील चिमकुलीवर बलात्कार करणाºया नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच विविध घोषणा देत या घटनेचा निषेद व्यक्त करण्यात आला. यावेळी नगरसेवक हेमलता पाटील, कृती समितीचे राजेंद्र बागुल, सुरेश मारु, संजय साबळे, प्रकाश पगारे, बाळासाहेब गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र गवारे, प्रकाश पगारे, चंद्रभान पगारे, निशिकांत पगारे, राहुल तुपलोंढे, दिपक डोके आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चाPoliceपोलिसcollectorजिल्हाधिकारी