जानोरी : दिंडोरीत तालुक्यातील मडकीजांब येथे दारूबंदीसाठी गावातील महिला एकवटल्या असुन आज त्यांनी आक्रमक रूप धारण करत माजी सरपंच ललिता गांगोडे, ग्रा.प. सदस्य लंका मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदी प्रश्नावरून एक तास ठिय्या दिला व अवैध दारू विक्री तात्काळ बंद करणेसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले.सरपंच दत्तात्रय गांगोडे, उपसरपंच बाकेराव बोराडे, सोसायटी संचालक सचिन वडजे,पोलीस पाटील रोहिणी वडजे, ग्राम पंचायत सदस्य प्रभाकर वडजे, कैलास गायकवाड, लंका मोरे आदींनी महिलांसमवेत चर्चा केली व निवेदनाची तात्काळ दखल घेत दिंडोरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन कारवाईची मागणी केली. त्यानंतर दिंडोरी पोलीस स्टेशनचे बीट हवालदार ज्ञानेश्वर आव्हाड व वाघ दादा यांनी महिला शिष्टमंडळाचे लेखी निवेदन स्विकारले . संबधित अवैध दारू विक्रेत्यांची चौकशी करून कठोर कायदेशीर कायर्वाही करण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधितावर योग्य कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन अवैध दारू विक्री विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दारूबंदी समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.
दारूबंदी महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 01:34 IST
जानोरी : दिंडोरीत तालुक्यातील मडकीजांब येथे दारूबंदीसाठी गावातील महिला एकवटल्या असुन आज त्यांनी आक्रमक रूप धारण करत माजी सरपंच ललिता गांगोडे, ग्रा.प. सदस्य लंका मोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदी प्रश्नावरून एक तास ठिय्या दिला व अवैध दारू विक्री तात्काळ बंद करणेसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
दारूबंदी महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या
ठळक मुद्देमडकीजांब : अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी