शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने मागविला कामांचा प्रगती अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:28 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिकेकडून मागविल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

नाशिक : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिकेकडून मागविल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.केंद्र शासनाकडून नाशिक शहराची स्मार्ट सिटीत निवड केल्यानंतर केंद्र, राज्य व महापालिका यांच्या संयुक्त निधीतून शहराला स्मार्ट बनविण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून केले जात असून, गेल्या दोन वर्षांत शहरात फारशी कामे झालेली नसली तरी पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली आहे. काही कामे वादात अडकली असून, अजूनही गोदा प्रकल्पासह काही कामांमुळे शहराचे रूप पालटले जाण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे विकासकामे सुरू असताना प्रत्यक्ष स्थिती काय हे समजावून घेण्यासाठी केंद्राच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने महापालिकेकडून ५० मुद्द्यांवर माहिती मागविली आहे.शहरातून व्हॅट, सेल टॅक्स किती मिळाला, घरपट्टी-पाणीपट्टीतून मिळणारा महसूल, शहरातील कच्चे-पक्के रस्ते किती किलोमीटर आहेत. कचरा संकलनाची स्थिती व यातून मिळणारे उत्पन्न, पाणीपुरवठा स्थिती-प्रति माणसी होणारा पाणीपुरवठा, उद्यानाची संख्या, शहरातील गुन्हेगारीची आकडेवारी, शहरातील रोजगार व बेरोजगारांची स्थिती, वाहनांची संख्या, दररोज लागणारी वीज आदींसह इतर शासकीय विभागांशी संबंधित माहिती मागविण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी