शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाऱ्या बाप्पांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:46 IST

नाशिक : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर होईलच शिवाय, विसर्जनावेळी नदीपात्रातील जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातील. शासनासह सेवाभावी संस्थांच्या या प्रयत्नांना बºयाच प्रमाणात यशही येत आहे. त्यात, आता मिट्टी फाउण्डेशनच्या अनोख्या प्रयोगाची भर पडली असून, विसर्जनानंतर चक्क पाणी शुद्ध करणाºयाच बाप्पांची निर्मिती करत प्रदूषण नियंत्रणाचा उपाय शोधला आहे.

ठळक मुद्देमिट्टी फाउण्डेशनचा अनोखा प्रयोग; तुरटीयुक्त पर्यावरणपूरक गणराय परदेशातही रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात यंदाही पर्यावरणपूरक गणरायाचा जागर होईलच शिवाय, विसर्जनावेळी नदीपात्रातील जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्तिदानासारख्या उपाययोजना राबविल्या जातील. शासनासह सेवाभावी संस्थांच्या या प्रयत्नांना बºयाच प्रमाणात यशही येत आहे. त्यात, आता मिट्टी फाउण्डेशनच्या अनोख्या प्रयोगाची भर पडली असून, विसर्जनानंतर चक्क पाणी शुद्ध करणाºयाच बाप्पांची निर्मिती करत प्रदूषण नियंत्रणाचा उपाय शोधला आहे.नाशिकमध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून गणेशमूर्ती घडविणाºया मोरे कुटुंबीयातील मयूर, हर्षद व ओंकार या तिघा मूर्तिकार बंधूंनी मिट्टी फाउण्डेशनची स्थापना केलेली आहे. पर्यावरण संवर्धन हा मुख्य उद्देश या फाउण्डेशनचा आहे. त्यानुसार, फाउण्डेशनचे प्रयोगशील मूर्तिकार मयूर मोरे यांनी गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाणी शुद्ध करणाºया मूर्तीचीच निर्मिती केली आहे. या मूर्तीमध्ये तुरटीसह सेल्युलोज, गावरान गाईचे शेण व भौगोलिक परिस्थितीनुसार स्वदेशी बीज यांचा वापर करण्यात आला आहे. साधारपणे २ ते ३ किलो वजनाच्या मूर्तीत अंदाजे ३ हजार लिटर प्रदूषित पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे. सदर मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्यामधील सेंद्रीय द्रव्ये तेथील पाण्याचे शुद्धीकरण करणारे जिवांणूसाठी खाद्य म्हणून उपयोगात येते शिवाय पीओपीच्या मूर्तीमुळे व त्यातील घातक रंगांमुळे होणारे प्रदूषणही बºयाच प्रमाणात कमी होण्याची क्षमता या मूर्तींमध्ये असल्याचा दावा मयूर मोरे यांनी केला आहे. मिट्टी फाउण्डेशनने या मूर्तींची निर्मिती करताना त्याच्या अनेकदा चाचण्या घेतल्या. त्यात यश आल्यानंतर त्यातील काही मूर्ती परदेशातदेखील रवाना झाल्या आहेत. प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी प्रतिलिटर ८५ मिलीग्रॅम या प्रमाणात तुरटी मिसळावी लागते. ‘ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी प्रोजेक्ट आॅफ ड्रिकिंग वॉटर ट्रिटमेंट’ या संशोधन प्रबंधात तुरटीचा उपयोग सांगितला आहे. ग्राफिन आॅक्साइडमुळे जल-शुद्धिकरण रसायनविरहित होते, असे वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनने एका संशोधनाअंती सिद्ध केले आहे. तुरटी ही शुद्धिकरणासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने मूर्तिकामात तिचा प्रमाणबद्ध वापर करण्यात आला. तुरटी पाण्यात मिसळल्यानंतर ती फॉस्फरस पार्टीकलसोबत मजबूत बंध निर्माण करते. पर्यावरणपूरक शाडूचे गणपती तयार करण्याची परंपरा आम्ही चार पिढ्यांपासून जोपासत आलो आहे. अजूनही लोक मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. या मूर्ती रासायनिक रंगांशिवाय खुलत नाहीत. रंगांचा पक्केपणा राहावा यासाठी त्यात फेसिन हे रसायन वापरतात. ते सडू नये यासाठी सोडीयम ट्रायक्लोरो फायनेट हे घातक रसायन वापरतात. रंग लवकर सुकावा यासाठी शिसे व पारा यांचा वापर करतात. हे नदीच्या पाण्यात मिसळल्याने प्रदूषण होते. ते टाळण्यासाठीच आम्ही हा प्रयोग केला आहे.- मयूर मोरे, संस्थापक, मिट्टी फाउण्डेशन.