शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागेतच आता बेदाणा निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:30 IST

ओझर : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउनचा मोठा फटका द्राक्ष पंढरीत बसत असून, कवडीमोल दराने शेतकरी ऐन हंगामात काढणीला आलेली निर्यातक्षम द्राक्ष बेदाण्याला देत आहेत, परंतु दीक्षी (ता. निफाड) येथील सतीश चौधरी यांनी स्वत:च जोखीम घेऊन दोन एकर काढणीला तयार झालेल्या द्राक्षबागेवर डिपिंग आॅइल आणि पोटॅशियम बाय कार्बोनेट यांचे मिश्रण करून वेलीवर असणाऱ्या द्राक्ष घडांवर स्प्रे केला आहे. आणि छाटणी करत झाडावरची द्राक्षे झाडावरच ठेवली.

ओझर : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लॉकडाउनचा मोठा फटका द्राक्ष पंढरीत बसत असून, कवडीमोल दराने शेतकरी ऐन हंगामात काढणीला आलेली निर्यातक्षम द्राक्ष बेदाण्याला देत आहेत, परंतु दीक्षी (ता. निफाड) येथील सतीश चौधरी यांनी स्वत:च जोखीम घेऊन दोन एकर काढणीला तयार झालेल्या द्राक्षबागेवर डिपिंग आॅइल आणि पोटॅशियम बाय कार्बोनेट यांचे मिश्रण करून वेलीवर असणाऱ्या द्राक्ष घडांवर स्प्रे केला आहे. आणि छाटणी करत झाडावरची द्राक्षे झाडावरच ठेवली.आधीच अतिवृष्टीने बेजार झालेल्या आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेऊन वाढविलेल्या ऐन हंगामात कोरोनाने बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले असून, बॅँकेचे कर्ज आणि पेस्टिसाइडचे पैसे कसे द्यायचे असा प्रश्न हा शेतकऱ्यांना पडला आहे. या पडत्या काळात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी जगाचा पोशिंदा अनेक उपाय शोधत आहेत. द्राक्ष हे नाशवंत पीक आहे. त्याच्यावर प्रक्रिया करूनच काही हाती लागेल हीच अपेक्षा सध्या बळीराजापुढे आहे.आपल्या कृषिप्रधान देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. संपूर्ण अन्नधान्यापासून खाण्याच्या वस्तू या शेतीतूनच निर्माण केल्या नाही तर सीमेंटची जंगले पसरलेल्या मोठी लोकसंख्या भूकबळी ठरतील शासनाने शेतीत तयार झालेला मालासाठी उपाययोजना शोधली नाही तर ग्रामीण भागातील हा जगाचा पोशिंदा पेचात सापडल्याशिवाय राहणार नाही.साधारणत: तीन किलो द्राक्षापासून एक किलो बेदाणा तयार होतो, त्यासाठी साधारणपणे सर्व खर्च धरून अडीचशे रु पये खर्च येतो आणि बाजारात एक किलो चांगल्याप्रतीच्या नंबर एकच्या बेदाण्याला दीडशे ते जास्तीत जास्त दोनशेरु पये दर मिळतो मग पन्नास रुपये जादा खर्चाची तोडमिळवणी कशी करायची? त्यातल्या त्यात याद्राक्ष हंगामात बहुतांशी शेतकºयांनी बाजारपेठेत द्राक्ष जात नसल्यानेशंभर रुपयांत पाच किलो द्राक्ष देण्याचा उपाय शोधला तर काहींनी अल्प दरात म्हणजे आठ रुपये किलोप्रमाणे सर्रास बेदाण्यासाठी द्राक्ष दिल्याने यंदा बेदाणा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे बेदाण्यालाही भाव राहील असे वाटत नाही, परंतु शेतकरी सध्या हतबल झाला आहे.---------ऐन हंगामात लॉकडाउन झाल्याने द्राक्ष उत्पादकांची मोठी पंचाईत झाली. बेदाणे उत्पादक अडवणूक करून तयार माल कवडीमोल दराने घेत आहे. त्यामुळे तयार द्राक्षबागेवरच स्प्रे करून बेदाणा (मनुके) करण्याचा निर्णय घेतला. धोका स्वीकारून जवळपास दोन एकरमधून दोनशे क्विंटल मालावर प्रक्रि या करण्यात आली आहे.- सतीश चौधरी, दीक्षी

टॅग्स :Nashikनाशिक