शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बलिप्रतिपदानिमित्त रेड्यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:50 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि.२८) सायंकाळी विविध ठिकाणी रेड्यांची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे.

पंचवटी : दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि.२८) सायंकाळी विविध ठिकाणी रेड्यांची ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात बलिप्रतिपदेला नाशिक शहरात विशेषत: पंचवटीत रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. सायंकाळी ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून काढलेल्या मिरवणुकीत भाविक आणि दुग्ध व्यावसायिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.सायंकाळी रेड्यांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर विविध संदेश लिखित करण्यात आले होते. रेड्यांच्या पाठीवर काढलेली विविध देवदेवतांची चित्रे, विविध संदेश रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. दुग्धव्यावसायिकांनी रेड्यांची सजावट केली. त्यानंतर पूजन व आरती केली. सायंकाळी ७ वाजता सवाद्य मिरवणूक सुरू झाली. नागेश्वर मंदिर येथून सवाद्य मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. पुढे रेड्यांना मिरवणूक मार्गावर असलेल्या गंगाघाट सांडव्यावरची देवी मंदिर, म्हसोबा महाराज, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड येथील म्हसोबा महाराज मंदिर आदी ठिकाणी दर्शनासाठी नेले होते.मिरवणुकीत भास्कर शिंदे, अनिल कोठुळे, सुनील शिंदे, महेश कल्याणकर, भूषण शिंदे, महेश कोठुळे, सागर गरड, प्रकाश येवलेकर, वैभव येवलेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.मिरवणुकीच्या पुढे विद्युत रोषणाई केलेले वाहन व ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली. पंचवटीतील नागचौक, कृष्णनगर, आडगाव, सरदार चौक, नांदूर, मानूर, जुना आडगाव नाका, म्हसरूळ, पेठरोड, मखमलाबाद, दत्तनगर, नवनाथनगर, हिरावाडी येथील दुग्धव्यावसायिकांनी बलिप्रतिपदानिमित्ताने रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढली होती.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिकcultureसांस्कृतिक