येवला : भगवान सहस्रार्जुन जयंतीनिमित्त येवला शहरातून क्षत्रिय समाजातर्फे मिरवणूक काढण्यात आली. येथील क्षत्रिय समाजाच्या बालेश्वरी मंदिरात सुरुवातीला मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पालखीत भगवान सहस्रार्जुन यांची प्रतिमा ठेवून समाजबांधवांनी पूजन केले. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत युवकांनी घातलेली भगव्या रंगाची टोपी व भगवा फेटेधारी महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. या मिरवणुकीत क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष गोविंदसा वाडेकर, उपाध्यक्ष रवींद्रसा चौधरी यांच्यासह क्षत्रिय ग्रुप, श्री सो.श. सहस्रार्जुन उत्सव मंडळ, क्षत्रिय महिला मंडळ सहभागी झाले होते. या मिरवणुकीसाठी अविनाश कुक्कर, प्रवीण पहिलवान, ओनील वडे, हर्षल कोकणे, अमोल वखारे, राजीव वाडेकर, शेखर खेरूड, पंकज पहिलवान, आत्मेश वाडेकर, सचिन वखारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मिरवणुकीस क्षत्रिय बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीनंतर अल्पोपहाराने समारोप झाला. त्यानंतर क्षत्रिय युवक मंडळाच्या वतीने महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. (वार्ताहर)
भगवान सहस्रार्जुन जयंतीनिमित्त मिरवणूक
By admin | Updated: November 18, 2015 22:52 IST