नाशिक : महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती मंगळवार ( दि ३) रोजी शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त उत्सव समितीच्यावतीने पंचवटी कारंजा येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप रविवार कारंजा येथील वडांगळीकर स्वामी मठ येथे करण्यात आला. यावेळी समाजबांधवांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. जयंती निमित्त सकाळी रविवार कारंजा येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटना व नासिक वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे सामुदायिक पूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील नगरसेविका ॲड. वैशाली भोसले व समाजातील ज्येष्ठ नागरिक शिवाजीराव रावले यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल कोठुळे यांनी केले . या प्रसंगी गुरुमित बग्गा,उध्दव निमसे, डाॅ शोभा बच्छाव,शरद आहेर वत्सलाताई खैरे कमलेश बोडके, डाॅ सुनील हिंगमिरे,धोडुनाना हिंगमिरे,शेखर भांयभग,शशिकांत कोठुळे,सचिन धोंगडे दादा दंदणे ॲड. पाचपाटील,उमेश आटवणे ,कैलास कोठुळे, दीपक जांभळे, सागर आनापुरे ,गणेश भोरे, प्रकाश गवळी,आदींसह समाज बांधव उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता पंचवटी कारंजा येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मालेगाव स्टॅड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ मार्गे मिरवणूक वडांगळीकर स्वामी मठापर्यंत पोहोचली तेथे सांगता समारंभ झाला. मिरवणुकीत समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विविध वेशभूषा केलेले बालगोपाळ अनेकांचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरात मिरवणुक उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 01:07 IST
महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती मंगळवार ( दि ३) रोजी शहरातील विविध भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती उत्सवानिमित्त उत्सव समितीच्यावतीने पंचवटी कारंजा येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप रविवार कारंजा येथील वडांगळीकर स्वामी मठ येथे करण्यात आला.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरात मिरवणुक उत्साहात
ठळक मुद्देसामुदायिक पूजन : समाजबांधवांंना महाप्रसादाचे वाटप