नाशिक : प्लॅस्टिकबंदीनंतर राज्यातील व्यापारी व उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्लॅस्टिकबंदीनंतर व्यापाºयांमध्ये संतप्त भावना उमटून लागल्या असून, मंगळवारी (दि.२५) मंत्रालयात शक्तिप्रदक्त समितीसमोर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या यांच्या नेतृत्वात व्यापारी व उद्योजकांनी प्लॅस्टिकबंदी संदर्भात अडचणी मांडतानाच प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी व्यापारी व उद्योजकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.राज्य सरकारने २३ जूनपासून प्लॅस्टिक बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्यामुळे प्रशानाने कारावाईमुळे व्यापारी व उद्योजक संतप्त झाले असून, या संदर्भात नाशिकमध्ये सोमवारी (दि. २५) व्यापारी-उद्योजकांची बैठक झाली. त्यानंतर मंगळवारी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या यांनी चेंबरच्या मुंबईतील कार्यालयात व्यापारी संघटनांची बैठक बोलावून प्लॅस्टिकबंदीमुळे राज्यभरातील व्यापारी व उद्योजकांना प्रत्यक्षात जाणवत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली.यावेळी कदम यांनी व्यापाºयांच्या शिष्टमंडळाची बाजू जाणून घेतल्यानंतर शनिवारी (दि. ३०) जून रोजी प्लॅस्टिकबंदीसंदर्भात मंत्रालयात होणाºया शक्तिप्रदक्त समितीच्या बैठकीत व्यापारी-उद्योजकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.यावेळी व्यापारी शिष्टमंडळातील खाद्यतेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकर ठक्कर, मुंबई ग्रेन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमणिकलाल छेडा, जयंती छेडा, फेडरेशन आॅफ महाराष्ट्र स्टेशनरी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर केनिया, प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शहा, आॅल इंडिया बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष के. पी. इरानी, सुरेंद्रपाल सिंग, कर्मवीर सिंग, क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे मोहन साधवानी, यांच्यासह व्यापारी-उद्योजकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. व्यापारी व उद्योजकांच्या अडचणींचाही विचार व्हावा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय योग्य असला तरी व्यापारी व उद्योजकांच्या अडचणींचाही विचार व्हावा, असा सूर व्यापाºयांमध्ये उमटला. त्यामुळे सभेनंतर व्यापारी व उद्योजक यांच्या शिष्टमंडळाने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेत त्यांना व्यापाºयांच्या समस्या व अडचणींविषयी कल्पना देत व्यापºयांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
पर्यावरणमंत्र्यांसमोर व्यापाºयांनी मांडल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 01:11 IST
नाशिक : प्लॅस्टिकबंदीनंतर राज्यातील व्यापारी व उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्लॅस्टिकबंदीनंतर व्यापाºयांमध्ये संतप्त भावना उमटून लागल्या असून, मंगळवारी (दि.२५) मंत्रालयात शक्तिप्रदक्त समितीसमोर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या यांच्या नेतृत्वात व्यापारी व उद्योजकांनी प्लॅस्टिकबंदी संदर्भात अडचणी मांडतानाच प्लॅस्टिकला पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी व्यापारी व उद्योजकांच्या प्रश्नांबाबत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले.
पर्यावरणमंत्र्यांसमोर व्यापाºयांनी मांडल्या समस्या
ठळक मुद्देनिवेदन : ३० जूनला शक्तिप्रदक्त समितीच्या बैठकीनंतर निर्णयाचे आश्वासन