शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : टँकर शंभरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:58 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन अद्याप जिल्ह्यात झालेले नसल्याने पाऊस लांबणीवर पडल्यास टॅँकर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मान्सूनचे आगमन अद्याप जिल्ह्यात झालेले नसल्याने पाऊस लांबणीवर पडल्यास टॅँकर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  गेल्या वर्षी मेअखेर जिल्ह्यात ७८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाईग्रस्त गावांची तृष्णा भागविण्यात आली होती, तथापि, पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस पडून नदी, नाले दुथडी भरून वाहिले व धरणांमध्येही शंभर टक्केपाणी साठवणूक झाली असताना यंदा जानेवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. सिन्नर, नांदगाव, बागलाण तालुक्यांनी टॅँकरचे प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाने या प्रस्तावांमध्ये तांत्रिक दोष काढून ते परत पाठविले व ज्या गावांना पाणीटंचाई निर्माण झाली त्या गावाच्या लगत तीन किलोमीटर अंतरावर पाण्याचे स्रोत शोधण्याचा जालीम उपाय सुचविण्यात आला होता. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे  मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या उद्घाटनाचा सपाटाही लावण्यात आला तर गेल्या चार वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेत केलेल्या कामांनी भूपृष्ठातील जलपातळी वाढल्याचे दावेही करण्यात आले. प्रत्यक्षात जून महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही जिल्ह्णातील अकरा तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, १२८ गावे व २९९ वाड्यांसाठी ९५ टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्णात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही, मात्र ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत दमदार पाऊस झाल्याशिवाय ते शक्य नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई