शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटी रुपयांच्या बाजार फी वसुलीचे खासगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 01:32 IST

शहरात ठिकठिकाणी फेरीवाले आणि व्यावसायिक असून, त्यांच्याकडून सध्या बाजार शुल्क वसुली जवळपास बंद आहे. त्यामुळे सध्या वार्षिक दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी ते पुरेसे नसल्याने पाचपट अधिक वसुली करून देण्यासाठी म्हणजेच दहा कोटी रुपयांच्या बाजार फी वसुलीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलवकरच निविदा : पाचपट उत्पन्न वाढण्याचा अंदाज

नाशिक : शहरात ठिकठिकाणी फेरीवाले आणि व्यावसायिक असून, त्यांच्याकडून सध्या बाजार शुल्क वसुली जवळपास बंद आहे. त्यामुळे सध्या वार्षिक दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असले तरी ते पुरेसे नसल्याने पाचपट अधिक वसुली करून देण्यासाठी म्हणजेच दहा कोटी रुपयांच्या बाजार फी वसुलीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. महापालिकेला दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देताना कमीत कमी त्यातील कमीत कमी कमिशन जो प्रस्तावित करेल, अशा ठेकेदाराला हे काम देण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे काटेकोरपणे वसुली होण्याचा अंदाज आहे.  महापालिकेने शहरात फेरीवाला क्षेत्र घोषित केले असून, त्यात अधिकृतरीत्या वसवलेले सुमारे नऊ हजार फेरीवाले आणि विक्रेते आहेत; परंतु अनेक ठिकाणचे फेरीवालाक्षेत्रदेखील रद्द झाले आहेत. त्यातच महापालिकेच्या वतीने जे अधिकृत फेरीवाले नाहीत त्यांच्याकडूनदेखील बाजार फी वसूल केली जात होती. त्यामुळे सुमारे दोन कोटी रुपये उत्पन्न मिळत असले तरी डॉन बॉस्कोजवळ महापालिकेने बेकायदेशीररीत्या वसवलेल्या फेरीवालाक्षेत्राकडून वसुली सुरू असल्याचे प्रकरण प्रशासनाच्या अंगाशी आले. बेकायदेशीर फेरीवाल्यांकडून महापालिका शुल्क वसूलच कसे काय करते, असा प्रश्न उच्च न्यायालयाने केल्याने शहरातील बाजार शुल्क वसुली सध्या बंद आहे. फेरीवालाक्षेत्रात असलेल्या विक्रेत्यांकडून वसुली करायची, तर अनेकांना त्यांच्या जागेचे पत्रच दिलेले नव्हते, अशा अनेक घोळानंतर आता अधिकृत विक्रेत्यांकडून वसुली सुरू असली तरीही पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे नियम पडताळून वसुली तपासली तरी दहा कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यानुसार वसुली करण्यासाठी महापालिकेकडे अपेक्षित मनुष्यबळ नसल्याने बाजार फी वसुलीचा ठेका देण्याचा प्रस्ताव आहे. किमान दहा काेटी रुपये वसूल करून देताना जो कमीत कमी कमिशन आकारेल त्याला ठेका देण्याची पद्धती अवलंबिण्यात येेणार आहे. त्यामुळे अधिकाधिक महसूल मिळेल, असा महापालिकेच्या मूल्यांकन व करवसुली विभागाचा दावा आहे. बेकायदेशीर फेरीवाले हटणारकेंद्र शासनाच्या फेरीवाला धोरणांतर्गत बायोमेट्रिक हजेरी आणि ओळखपत्र दिलेले विक्रेतेच अधिकृत असून, त्यांच्याकडून वसुली करता येऊ शकते. बाकीच्या फेरीवाल्यांना हटवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे आता फेरीवाला झोनची पुनर्रचना करून वाढलेल्या फेरीवाल्यांनादेखील सामावून घ्यावे लागणार आहे. मात्र, यासंदर्भातील अतिक्रमण विभागाची कार्यवाही सध्या ठप्प आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकरMONEYपैसा