शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवळा बसस्थानकाला खासगी वाहनांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 12:26 IST

देवळा : येथील बसस्थानकावर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा वेढा बसस्थानकाला पडत असल्यामुळे बसस्थानकात येणार्या व जाणाऱ्या बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

देवळा : येथील बसस्थानकावर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा बसस्थानकाला पडत असल्यामुळे बसस्थानकात येणार्या व जाणाऱ्या बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.देवळा हे चौफुलीवर वसलेले शहर असून येथून राज्य व आंतरराज्य बसेसची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू असते. संपूर्ण नासिक जिल्हयात खड्डेमुक्त बसस्थानक म्हणून पूर्वीपासून या बसस्थानकाची ख्याती आहे. विंचूर - प्रकाशा महामार्गा पासून १०० मीटर अंतरावर असलेल्या देवळा बसस्थानकात दिवसभरात ४५० बसेसची ये जा सुरू असते. नासिक,नंदुरबार, साक्र ी, सटाणा, सुरत, पुणा, नासिक, मुंबई, नगर, धुळे, जळगाव आदी आगाराच्या बसेसची दिवसभर ये जा सुरू असते. यामुळे बसस्थानक सतत गजबजलेले असते. रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते.आठवडे बाजारासाठी ग्रामीण भागातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने बाजारहाट करण्यासाठी देवळा येथे येतात. यापैकी अनेक जण आपल्या दुचाकीने येतात. शहरात पार्किंगची सुविधा नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या दुचाकी बसस्थानकाच्या आवारात उभ्या करतात. यामुळे बसस्थानक दुचाकींनी भरून जाते. बसस्थानकाच्या प्रवेश मार्गावरच अनेक भाजीपाला विक्र ेते वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्ता अडवून बसतात. या प्रवेश मार्गासमोरूनच आठवडे बाजारात जाण्याचा रस्ता असल्यामुळे ह्या ठिकाणी सतत गर्दी असते.पोलीस या ठिकाणी बॅरीकेटसचा वापर करत नसल्यामुळे सर्वत्र बेशिस्त निर्माण होते. यामुळे बस चालकांना या गर्दीतूनच वाट काढत बसस्थानकात प्रवेश करावा लागतो. त्यातच खासगी वाहने देखील बसस्थानकात ये जा करतात. यामुळे बसस्थानकात येणाºया व जाण्याºया बसला अडथळे निर्माण होतात.परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे.--------------------------स्वच्छ व सुंदर देवळा या संकल्पपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या देवळा नगरपंचायतीच्या वतीने शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. यामुळे शहराचे रूप पालटू लागले आहे. शहराचे होत असलेले विस्तारीकरण, व वाहनांची वाढती संख्या पाहता शहरात पार्कींगसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कारण शहरातील सुभाष चौक, पाच कंदील, बसस्थानक परिसरात वाहनचालक आपली वाहने बेशिस्तपणे उभी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. देवळा नगरपंचायत प्रशासनाने शहरातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक