शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नोटांच्या छपाईचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:01 IST

नोटाटंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी करन्सी नोट प्रेसमध्ये सुरू असलेल्या नोटा छपाईला वेग देण्याचे आदेश देण्यात आले असून, आता नोटा छपाईचा वेग ४० टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. यामुळे दररोज एक कोटी नोटा छपाईचा वेग आता १.४ कोटी नोटा इतका करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये छापलेल्या ५०० रुपयांच्या आठ कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिक : नोटाटंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी करन्सी नोट प्रेसमध्ये सुरू असलेल्या नोटा छपाईला वेग देण्याचे आदेश देण्यात आले असून, आता नोटा छपाईचा वेग ४० टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. यामुळे दररोज एक कोटी नोटा छपाईचा वेग आता १.४ कोटी नोटा इतका करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये छापलेल्या ५०० रुपयांच्या आठ कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकरोडच्या प्रेसमध्ये ५० आणि ५०० रुपयांच्या नोटांचीच छपाई सुरू आहे.  सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रेस महामंडळाच्या नाशिकरोड, देवास येथे नोट प्रेस आहेत. रिझर्व्ह बॅँंकेने स्वत:चे नोटांचे कारखाने सुरू केले आहेत. ते कर्नाटकातील म्हैसूर आणि बंगालमधील सालगोणी येथे आहेत. देशात फक्त या चार ठिकाणी नोटांची छपाई केली जाते. या सर्व प्रेसमध्ये मिळून पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन पाचपटीने वाढविण्याचे आदेश आहेत. म्हणजेच दिवसाला अडीच हजार कोटी नोटा छापल्या जाणार आहेत. पाचशेच्या नोटांचे उत्पादन वाढविण्याचे निर्देश नाशिकरोड प्रेसला मिळाले आहेत. पाचशेची नवी आर्डर रिझर्व्ह बॅँकेकडून मिळाल्याने गेल्यावर्षी पाचशेच्या नोटांची छपाई थांबली होती. ती एप्रिलच्या मध्याला पुन्हा सुरू झाली. पाचशेच्या ८० दशलक्ष नोटा रिझर्व्ह बॅँकेला गेल्या पंधरवड्यात पाठविण्यात आल्या आहेत. या नोटा चलनात येण्यास काही दिवस लागतील. सध्या या नोटांची छपाई दिवसाला आठ दशलक्षापर्यंत पोहचली आहे. ती १२ दशलक्ष करण्यात येणार आहे.  नाशिकरोड प्रेसमध्ये दहापासून पाचशेपर्यंतच्या नोटांची छपाई होते. काही दिवसांपूर्वी पुन्हा नोटटंचाई झाल्याने नाशिकरोड प्रेस कामगारांनी पुन्हा साप्ताहिक सुटी न घेता काम सुरू केले आहे. तांत्रिक कारणांमुळे नोटांची छपाई घटली होती. दिल्लीतील लालफितीच्या कारभारामुळे १ एप्रिलपासून छपाई घटून दहा दशलक्षांवर आली. आता केंद्र सरकारकडून आदेश आल्याने छपाई दिवसाला १४ दशलक्ष करण्यात आली आहे. हे प्रमाण आणखी वाढविले जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार नोटप्रेसमध्ये दररोज ५००च्या ८० लक्ष आणि ५० रुपयांच्या ६० लाख नोटा छापत आहेत. सुटीच्या दिवशीही नोटा छपाईचे काम सुरूच असल्याचे प्रेसच्या सूत्रांनी सांगितले. महाराष्टÑदिनीद  ेखील कामगारांनी नोटा छपाईच्या कामासाठी हजेरी लावली होती. रविवारी साप्ताहिक सुटीलाही नोटा छपाईचे काम सुरू आहे.

टॅग्स :Nashikनाशिक