शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारूसाठी लागणाऱ्या साहित्याच्या गुदामावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:23 IST

घोटी : हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळासह नवसागर विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या गुदामावर पोलिसांनी छापा टाकत एका ट्रकसह १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी मयूर रतन वालझाडे याला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देघोटीत कारवाई : १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

घोटी : हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळासह नवसागर विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या गुदामावर पोलिसांनी छापा टाकत एका ट्रकसह १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी मयूर रतन वालझाडे याला अटक करण्यात आली आहे.घोटी शहरातील व्यापारी मयूर रतन वालझाडे (२९, रा. नवनाथनगर) याच्या गुदामावर हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा काळा गूळ व नवसागरची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, नितीन पाटील यांच्यासह इगतपुरी, घोटी ठाण्यातील पोलीस पथकातील काही निवडक पोलीस पथक तयार करून घोटी येथील गुदामावर छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस पथकाने खासगी वाहनाने जात घोटी-सिन्नर उड्डाणपुलाजवळ जाऊन पाहणी केली असता तारा प्लाझा इमारतीत एका ट्रकमधून काळ्या गुळाच्या गोण्या गुदामामध्ये उतरवीत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत हातभट्टीवर गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा गूळ असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा अधिक तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.काळा गूळ; नवसागरचा साठापोलिसांनी छापा टाकून काळा गूळ, नवसागर व ट्रक ताब्यात घेऊन जप्त केला. या छाप्यात सहा लाख ८८ हजार किमतीच्या जगरी पावडरच्या ८२५ गोण्या, ९३ हजार किमतीच्या ११३ जगरी पावडरच्या गोण्या, एक लाख ५२ हजार रुपये किमतीच्या १९० गोण्यातील काळा गूळ, ५६ हजार रुपये किमतीच्या बारदानच्या ७० गोण्यांमधील काळा गूळ, ३६ हजार किमतीच्या १२० खराब काळ्या गुळाच्या भेल्या, ५६ हजार किमतीचे १२५ काळ्या गुळाचे बॉक्स, ४४ हजार किमतीचे ७९ नवसागरचे बॉक्स, पाच हजार किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व दहा लाख किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे