शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत वाघाडी नदीजवळील जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:34 IST

पंचवटीच्या वाघाडी नदीजवळील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़

नाशिक : पंचवटीच्या वाघाडी नदीजवळील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या पाच जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़  वाघाडी नदीजवळ जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता संशयित भरत दिगंबर पुराणिक (२९), बबलू सदानंद नहिरे (३२), प्रशांत भालचंद्र वालेकर (३०), सचिन वसंत मेवले (२६), कुणाल दशरथ पाटील (३२, सर्व रा. वाल्मीकनगर, मजूरवाडी, पंचवटी) हे जुगार खेळत होते़ या पाचही संशयितांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे रोख रक्कम व जुगाराचे साहित्य आढळून आले़वृद्धेची आत्महत्यानाशिकरोडच्या जेलरोड परिसरातील कैलासजी सोसायटीलगत राहणाºया ६२ वर्षीय वृद्धेने घरातील सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास घडली़ कापसाबाई सदाशिव निकम (रा. जेलरोड) असे आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़गांजा बाळगणाºया वृद्धास अटकदेवळालीगाव परिसरात गांजा बाळगणाºया ७० वर्षीय वृद्धाला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली गावातील गायकवाड मळा परिसरातील रामचंद्र भागवत असे या आरोपीचे नाव आहे. संशयित रामचंद्र भागवत हा एमएच १४ बीएच १४६८ क्रमांकाच्या दुचाकीवरून देवळालीगाव ते रोकडोबावाडी यादरम्यान जात असताना उपनगर पोलिसांनी त्याला अडविले. यावेळी त्याची झडती घेतली असता, दुचाकीच्या डिक्कीत १ हजार ३९४ रुपये किमतीचा ६४५.६८ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. तीन पिशव्यांमधील पॅक असलेला गांजा पोलिसांनी जप्त केला. तसेच ३५ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकीही जप्त केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय