लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतल्यानंतर या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिंकाणी शेतकऱ्यांनी फटाके फोडत निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे.खामखेडा येथे घोषणाबाजीशेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्वत: मंजूरी व अल्प भूधारक शेतकऱ्यांना मध्यम मुदतीचे व पीक कर्ज माफ केले आहे. नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकरी एकजूटीचा हा विजय आहे. या निर्णयामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. या निर्णयाचे खामखेडा येथील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. खामखेडा चौफुलीवर शेतकऱ्यांनी शेतकरी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, सरपंच सोनवणे उपसरपंच संतोष मोरे, सोसायटीचे चेअरमन नानाजी मोरे, शांताराम शेवाळे, सुनिल शेवाळे, दादाजी निंबा बोरसे, संजय मोरे, जिभाऊ बोरसे, बापू शेवाळे, विश्वास शेवाळे, विठ्ठल शेवाळे, गोकुळ मोरे, वैभव पवार , दिनकर आहेर , महेश शिरोरे, रमेश मोरे , सुभाष बिरारी, बापू सोनवणे आदी उपस्थित होते. लासलगावी आनंदशेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं आहे. सुकाणू समतिी व सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाच्या बैठकीत तोडगा निघाला. कर्जमाफीच्या निर्णयानंतर लासलगाव व टाकळी फाट्यावर पंचायत समतिी सदस्य शिवा पाटील सुरासे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्याच प्रमाणे खळकमाळेगाव, वाळकेवाडी, खानगाव, उगाव, वनसगाव, शिवडी आदी परिसरात शेतकर्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. डोक्यावरील कर्जाचं ओझं हलकं झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.ब्राम्हणगाव येथील सुनील गवळी, सोमनाथ जाधव, मंगेश गवळी, विशाल गायकवाड, संदीप गवळी, संदीप चव्हाण, विष्णू लुटे, आंबदास जाधव, संतोष निफाड आदींनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. निफाडसह लासलगाव व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात निफाड लासलगाव व परिसरातील शेतकर्यांनी झोकून दिलं होतं. फक्त ५ एकर पर्यतच्या अल्प भूधारकांनाच लाभ मिळणार आहे. उदा. ज्या खातेदारांना चार मुले आहेत पण खाते एकाच्याच नावावर आहे, अशा खातेदारांना कर्ज माफी मिळणार नाही. तर जो शेतकरी अल्पभुधारक आहे पण शेतीला पुरक असा जोडधंदा करतो. आणि व्यवसायाचा प्राप्तीकर भरीत असल्यास त्याच्या आधार कार्डवरु न आॅनलाईन दिसून येणारच. अशा अल्पभुधारक शेतकर्याला देखील कर्जमाफी मिळणार नाही. घोषणा समाधानकारक म्हणता येणार नाही. - रामदास वारुणसे, त्र्यंबकेश्वर
रोज मरण्यापेक्षा एकदाच मरू ह्या बळीराजाच्या भुमिकेचा विजय झाला आहे. पहाटेच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्याने वेगळा पवित्रा घेतल्याने लढ्याला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. राज्य शासनाला जाग आणण्यासाठी बळीराजाला मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यावे लागले. बळीराजाला सरसकट कर्जमाफीबरोबरच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकर्याला संजीवनी देणारा ऐतिहासीक निर्णय ठरेल.-पुरु षोत्तम कडलग,सदस्य, किसान क्रती