शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी गावात खर्चाला फाटा देत आदिम लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:13 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सावरगाव (पठावे) या आदिवासी गावात प्रथमच लग्न सोहळ्याच्या खर्चिक पद्धतीस बगल देत आदिवासी बचाव अभियानांतर्गत पारंपरिक पद्धतीने अतिशय साध्या व कमी खर्चात आदिम लग्न सोहळा संपन्न झाला.

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सावरगाव (पठावे) या आदिवासी गावात प्रथमच लग्न सोहळ्याच्या खर्चिक पद्धतीस बगल देत आदिवासी बचाव अभियानांतर्गत पारंपरिक पद्धतीने अतिशय साध्या व कमी खर्चात आदिम लग्न सोहळा संपन्न झाला.शेकडो वर्षांची संस्कृती असलेला आदिवासी समाज खऱ्या अर्थाने डोंगर- दºयांमध्ये राहणारा. मात्र काळानुरूप या समाजामध्येही आधुनिकतेचा रंग चढू लागला होता. प्रतिष्ठेसाठी इतर समाजाप्रमाणेच आदिवासी समाजातही लग्न सोहळ्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागत होता. शासनाकडून लग्नांसाठी तुटपुंजी मदत दिलीही जात असे; मात्र महागाईच्या जमाम्यात लग्न पार पाडायचे म्हणजे कर्जकाढल्याशिवाय पर्याय राहत नसे.  शेकडो वर्षांपासून वाड्या- वस्त्यांवर एकोप्याने राहणाºया आदिवासी समाजामध्ये गरीब व श्रीमंतीची दरी निर्माण झाली. या अनिष्ठ प्रथा बंद करून आदिवासी संस्कृतीचा वारसा जपला जावा यासाठी सुशिक्षित व विविध पदांवर नोकरीस असणाºया आदिवासी बांधवांनी आदिवासी बचाव अभियानांतर्गत आदिम लगीन सोहळा साजरा करण्याचे काम सुरू केले आहे. या सोहळ्यांतर्गत सावरगाव येथे चि. देवानंद व चि. सौ. कां. वैशाली यांनी प्रथम धान पूजन करून महाभूतांची व निसर्गाची पूजा केली. मांडव मंत्रकार रमेश भोये यांनी मंगलाष्टके म्हटली. पुजारी दत्तू साबळे यांनी विविध पारंपरिक विधी करत उभय जोडपे विवाहबद्ध झाले. अन्नाचा कण न् कण कष्टाने कमवावा लागतो म्हणून पंगतीतल्या जेवणात अन्नाची नासधूस करायची नाही असे आवाहन अभियानातील पदाधिकाºयांनी केल्यानंतर पात्रामध्ये अन्नाचा एक कणही शिल्लक राहिला नाही.विवाहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे वराची मिरवणूक घोड्यावर न काढता सजवलेल्या बैलगाडीतून पारंपरिक वाद्याच्या गजरात काढण्यात आली. वधू-वरांवर अक्षताऐवजी विविध प्रकारच्या परंतु सहज उपलब्ध होणाºया फुलांचा वर्षाव करण्यात आला. यामुळे अन्नधान्याचे नुकसान टाळता आले.

टॅग्स :Nashikनाशिक