शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'मोदी मोदी'चा गजर...; पंतप्रधानांच्या 'रोड शो'ने संचारला युवा महोत्सवात उत्साह

By दिनेश पाठक | Updated: January 12, 2024 12:24 IST

फक्त पंधरा मिनिटे चालला रोड शो, नंतर काळाराम मंदिरात दर्शनासाठी रवाना

नाशिक : वंदे मातरम, भारत मातेचा जयघोष, मोदी मोदीचा गजर...जिकडे तिकडे उंचावलेले हात...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी टिपण्यासाठी सुरू असलेली धडपड... रस्त्याच्या दुतर्फा असलेली  प्रचंड गर्दी, फुलांची  उधळण, एकाहून एक असा सरस कलाविष्कार असा अमाप उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला दिसला. पंतप्रधानांनी देखील हात उंचावून उपस्थितांना दाद दिली. युवा वर्गाचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून आला. जवळपास एक लाख नागरिकांनी रोड शो ला हजेरी लावली.  मोदी यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याने रोड शो आटोपता घ्यावा लागला. रोड शो फक्त पंधरा मिनिटे चालला. राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी (दि.१२) सकाळी सव्वा दहा वाजता नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर झालेल्या रोड शोमुळे संपूर्ण वातावरण मोदीमय झाले. सकाळी अकरा वाजता रोड शो संपला. 

मोदी यांचे वाहन सुरळीत पुढे चालण्यासाठी रस्त्यावर बॅरेकेटींग करण्यात आले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. सुमारे दीड ते दोन किलोमीटर लांबीच्या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतर्गत रथातून बाहेर पडले. मोदींची एक झलक पाहण्यासाठी नाशिकवासिय आतुर दिसत होते. फुलांचा वर्षाव होत असताना पीएम मोदींनी सतत हात हलवत लोकांना अभिवादन केले. रोड शोसाठी पिंक सिटीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुरक्षेची जबाबदारी दोन हजारांहून अधिक पोलिसांनी घेतली. उत्तेजित जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. रोड शो आटोपून पंतप्रधान मोदी रामकुंडावर रवाना झाले. तेथे त्यांनी काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेतले. पाय ठेवायलाही जागा नाही 

तटबंदीवर पाय ठेवायला जागा उरलेली नव्हती. जमलेल्या गर्दीतील प्रत्येकजण हे ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होता. पीएम मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपाचे प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे वाहनावर होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिक