शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान हा एका पक्षाचा नसतो, त्यांचा आदर करावा, पातळी सोडून बोलणे चुकीचे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 13:22 IST

येवला : पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, ते संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्याबद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलणे चुकीचे ...

येवला : पंतप्रधान हा कोणत्या एका पक्षाचा नसतो, ते संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्याबद्दल कोणीही बोलताना पातळी सोडून बोलणे चुकीचे आहे, असे मत भाजपा नेत्या तथा माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. येवला दौऱ्यावर आलेल्या मुंडे यांनी विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र दराडे व शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी दराडे कुटुंबाच्यावतीने येवल्याची पैठणी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुंडे यांनी नाव न घेता पटोले यांच्यावर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात बोलताना, ८ फेब्रुवारीला कोर्टात निर्णय लागेपर्यंत त्याची मी प्रतीक्षा करणार आहे. मात्र पुढील होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होत असून याची मनाला पिडा आहे. याप्रश्नी सरकार आपले मत कसे मांडते, याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असून सरकारने प्रभावीपणे भूमिका मांडावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाजपमध्ये आपण नाराज आहात का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, स्मितहास्य करून मुंडे यांनी त्यावर उत्तर देणे टाळले.

याप्रसंगी आमदार दराडे बंधूंसह जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, मीना दराडे, डॉ. कविता दराडे, सिद्धांत दराडे, भाजपा नगरसेवक प्रमोद सस्कर, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष सुनील काटवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPankaja Mundeपंकजा मुंडे