शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

वादळी वाऱ्यामुळे उडाले भावडे प्राथमिक शाळेचे पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 9:53 PM

खर्डे : रविवारी (दि.१४) रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाºयाने भावडे (ता.देवळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे तात्काळ शाळा दुरु ती करावी असे आदेश दिले

खर्डे : रविवारी (दि.१४) रोजी रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाºयाने भावडे (ता.देवळा) येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.देवळा-नाशिक रस्त्यालगत मोरेवस्तीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथील दोन वर्गखोल्यांचे निम्म्या बाजूचे पत्रे उडून बाजूस पडले आहेत. सुदैवाने ही घटना रात्री १० वाजेच्या सुमारास झाल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.या ठिकाणी मतदान केंद्र असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर शाळेचे पत्रे उडाल्याने प्रशासनाने या घटनेची तात्काळ नोंद घेत सर्व यंत्रणा कामास लावली आहे.चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी फोनवरून या घटनेची चौकशी करून तात्काळ शाळा दुरु ती करावी असे आदेश दिले आहेत.तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, गटविकास अधिकारी महेश पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी विजया फलके, केंद्र प्रमुख संजय ब्राह्मणकार आदींनी शाळेत जाऊन नुकसानीची पाहणी केली. तलाठी श्रीमती साळवे, ग्रामसेवक वासंती देसले यांनी घटनेचा पंचनामा केला. शाखा अभियंता आर. बी. चव्हाण यांनी दुरु स्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून घेतले व ग्रामपंचायत स्तरावरून येत्या दोन तीन दिवसात वर्गखोल्या दुरु स्त करून देऊ असे उपस्थित पालकांना सांगितले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब भदाणे, विनायक मोरे, पोलीस पाटील विष्णू साबळे, कैलास आहेर, राकेश गुंजाळ, किशोर पाटील, सागर मोरे, नितीन मोरे, मेहुल मोरे, अशोक मोरे, किरण भदाणे आदी उपस्थित होते.