तळागाळातील माणसांचा गौरव

By Admin | Updated: May 24, 2014 01:07 IST2014-05-23T22:45:08+5:302014-05-24T01:07:17+5:30

रोटरी क्लब : व्यवसाय गुणगौरव पुरस्कारांचे वितरण

The pride of the underprivileged | तळागाळातील माणसांचा गौरव

तळागाळातील माणसांचा गौरव

रोटरी क्लब : व्यवसाय गुणगौरव पुरस्कारांचे वितरण

सिडको : सार्वजनिक क्षेत्रातील तळागाळातील लोकांचा शोध घेऊन, त्यांनी त्यांचे काम सांभाळून लोकांसाठी दिलेल्या योगदान सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ अंबडच्या वतीने व्यवसाय गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रातील तळागाळात काम करीत असताना, आपले काम सांभाळून समाजासाठी योगदान देणार्‍यांचा सत्कार रोटरी क्लबच्या वतीने केला जातो. यंदाच्या वर्षीही अशा व्यक्तींना व्यवसाय गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाचे नाना दिवे, मनपा सफाई कर्मचारी चिंतामण पवार, तुलसी आय हॉस्पिटलचे वॉर्डबॉय गजानन गायकवाड, इलेक्ट्रीशियन संदीप भागवत, बँक ऑफ इंडियाच्या अंबड शाखेतील रोखपाल विजय पगारे, सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या जनसंपर्क अधिकारी शोभा वैद्य, सिडकोतील पोस्टमन हेमंत धारणकर आदिंचा समावेश आहे. या सर्वांना रोटरी क्लबचे प्रांतपाल दादा देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी रोटरी अंबडचे अध्यक्ष टी. एच. पाटील, सचिव तुषार चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राम सर, मेजर खोत, भास्कर पवार, जे. आर.वाघ, मेजन पिल्लाई, एन. टी. गाजरे, हरी कुलकर्णी, राजीव कर्णिक, सी. शांताराम, समिंदर गुलेरिया, बी. एस. पाटील, कॅप्टन तारिक आदि उपस्थित होते.


यापुढेही असे उपक्रम...
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील गरीब व होतकरूंना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो. क्लबच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी आदि कार्यक्रमही घेतले जातात. यापुढेही असे उपक्रम राबविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.
- तुषार चव्हाण, सचिव, रोटरी क्लब, अंबड
 

Web Title: The pride of the underprivileged