शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

आदिवासी दिनी गुणवंताचा गौरव : आदिवासींचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज -राधाकृष्णन बी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:13 IST

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा, संशोधनपत्रिका व आदिवासी बोली भाषेतील शैक्षणिक क्रमिक पाठ्यपुस्तकांचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (दि.९) गोविंदनगर परिसरात आयोजित करण्यात आला होता.

ठळक मुद्देसर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करावे.विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणा-या एकूण ४१ विद्यार्थ्यांचा गौरवसंशोधन पत्रिकेचे प्रकाशन

नाशिकसर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. जिल्ह्यात सुमारे १५ लाख आदिवासी वास्तव्यास आहेत. त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत; मात्र अधिकाधिक प्रामाणिकपणे त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनासह सर्वच शासकीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा, संशोधनपत्रिका व आदिवासी बोली भाषेतील शैक्षणिक क्रमिक पाठ्यपुस्तकांचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (दि.९) गोविंदनगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आदिवासी विकास आयुक्त किरण कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी अमन मित्तल, अपर आयुक्त दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राधाकृष्णन् म्हणाले, आदिवासी बांधवांनी आपल्या शारीरिक-मानसिक क्षमता ओळखण्याची गरज आहे. आदिवासी दुर्गम भागात दर्जेदार आारोग्य, शिक्षणव्यवस्था पुरविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करावे. आपल्या जिल्ह्यातील आदिवासी भाग याबाबत काही प्रमाणात मागासलेला आहे. ‘मातृत्व’ अ‍ॅपमुळे जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.दरम्यान, भानसी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, आदिवासी विकास विभागाने शासनाच्या सर्व सवलती, योजनांचा प्रचार-प्रसार आदिवासी दुर्गम भागापर्यंत करावा. तसेच मुलांच्या शालेय प्रवेशासाठी असलेली तीन किलोमीटरच अट शिथिल करून ती पाच किलोमीटरची करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नाशिक विभागातील दहावी, बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणा-या एकूण ४१ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, राज्यस्तरावरील बक्षीस वितरण या सोहळ्यात काही कारणास्तव होऊ शकले नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध आदिवासी भागातील हस्तकला, मूर्तिकलाकारांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. आदिवासी कला-नृत्य पथकाच्या वतीने सादर क रण्यात आलेले विविध आदिवासी पारंपरिक नृत्यप्रकाराने यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.संशोधन पत्रिकेचे प्रकाशनआदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने दहा आदिवासी बोली भाषेतील ४४ शैक्षणिक क्रमिक पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आदिवासी मुलांना त्यांच्या बोली भाषेतून शिक्षण घेता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाNashikनाशिक