शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

कांदा भावात घसरण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:23 IST

लासलगाव :- देशातील इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे बंपर पिक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरु वात झाली आहे. शनिवार रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा ४०० रु पयांची घसरण झाली . पाच फेब्रूवारीच्या तुलनेत कांदा दरात १३०० रु पयांची घसरण झाल्याने कांद्याचे दर पंधराशे ...

लासलगाव :- देशातील इतरत्र असलेल्या राज्यांमध्ये कांद्याचे बंपर पिक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळण्यास सुरु वात झाली आहे. शनिवार रविवारच्या दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये पुन्हा ४०० रु पयांची घसरण झाली . पाच फेब्रूवारीच्या तुलनेत कांदा दरात १३०० रु पयांची घसरण झाल्याने कांद्याचे दर पंधराशे रु पयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण असून ही घसरण लवकर न थांबल्यास कांदा उत्पादक अडचणीत सापडतील . देशातील मध्यप्रदेश, राजस्थान ,गुजरातसह पश्चिम बंगालमध्ये नविन कांद्याची आवक झाल्याने तर राज्यातील पुणे व नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे पिक निघाल्याने मागणी कमी झाली असल्याचे मत सभापती जयदत्त होळकर यांनी व्यक्त केले आहे. कांद्याचे सरासरी दरामध्ये घसरण होण्यामागे कांद्याची इतरत्र व स्थानिक बाजारात वाढलेली आवक देखील कारणीभूत असल्याचेही मत कांदा तज्ञ व्यक्त करताय. तर होळीसाठी कामगार सुट्टीवर जात असल्याने कांदा लोडींगसाठी मजूर नसल्यानेही कांदा खरेदीवर परिणाम होत असल्याचे सांगीतले जात आहे. कांदा लागवडीपासून तर बाजार विक्र ी पर्यंत कांदा उत्पादक शेतकºयांना १० ते १२ रु पये प्रति किलोमागे खर्च येतो त्यामुळे आज विक्र ी होणार कांदा हा उत्पादक १ ते ३ रु पये किलोमागे तोट्यात विक्र ी करताना दिसत आहे .गेल्या आठवड्यातील २० फेब्रुवारी रोजी याच कांद्याला जास्तीजास्त १७९०, सरासरी १६८०, कमीतकमी हजार रूपये भाव मिळत होता. मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवसी कांद्याला जास्तीजास्त १३१५, सरासरी ११५० कमीतकमी ९०० भाव मिळाल्याने कांदा उत्पादक भलताच नाराज दिसत आहे .

टॅग्स :Nashikनाशिक