प्रेमाच्या सप्ताहात गुलाबाने घेतला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 09:34 PM2021-02-08T21:34:11+5:302021-02-09T00:36:39+5:30

देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ह्यव्हॅलेंटाइन डेह्ण. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या ह्यव्हॅलेंटाइन डेह्णसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब दाखल झाले आहेत. ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णच्या पार्श्वभूमीवर गुलाबाचे दर दुपटीने वाढल्याने तरुणाईच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.

The price of a rose in the week of love | प्रेमाच्या सप्ताहात गुलाबाने घेतला भाव

प्रेमाच्या सप्ताहात गुलाबाने घेतला भाव

Next
ठळक मुद्देदरात दुपटीने वाढ : तरुणाईत उत्साह, बाजारपेठा सजल्या

देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ह्यव्हॅलेंटाइन डेह्ण. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या ह्यव्हॅलेंटाइन डेह्णसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब दाखल झाले आहेत. ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णच्या पार्श्वभूमीवर गुलाबाचे दर दुपटीने वाढल्याने तरुणाईच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.

ह्यव्हॅलेंटाइन वीकह्ण साजरा करण्याचा प्लॅन केलेल्या प्रेमवीरांच्या खिशाला यंदा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ह्यरोझ डेह्णलाच झळ बसली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्यामुळे, गुलाबाच्या एका फुलासाठी साधारणपणे वीस ते पंचवीस रुपये मोजावे लागत आहेत. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरुणांमध्ये उत्सुकता असते, ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच ह्यव्हॅलेंटाइन डेह्णची. काही लोक आपल्या पार्टनरला फूल, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात, तर कुणी पार्टनरला रोमँटिक डेटला घेऊन जाते. ह्यरोझ डेह्णपासून ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णची सुरुवात होते.

या दिवशी प्रेमाचे प्रतीक म्हणून समजले जाणारे गुलाबाचे फूल आपल्या आवडत्या व्यक्तीला दिले जाते. बाजारात आलेल्या गुलाबाच्या फुलांमधील मोहक आणि ताजे असे गुलाब निवडून आपल्या मनातील प्रेमाची ह्यनाजूकह्ण भावना व्यक्त करण्यासाठी त्याची खरेदी केली जाते. यंदा मात्र, सातत्याने बदलत्या वातावरणाचा फुलांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत फुलांचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० रुपये एका गुलाबाच्या फुलासाठी मोजावे लागत आहेत. त्यातच आता ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णमध्ये गुलाबाच्या फुलांची मागणी लक्षात घेता, हे भाव २० ते २५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
                    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फूल उत्पादक शेतकऱ्यांसह फूल विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रेमाच्या या उत्सवात फूल व्यवसायाला उभारी मिळण्याचे चित्र दिसून येत आहे. ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णचा पहिला मान प्रेमाचा सुंगध परविणाऱ्या गुलाबाला आहे. यासाठी फुलांची बाजारपेठ सजली आहे. मात्र, गुलाब खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. गत आठवड्यात १० प्रति नगाने विक्री होत असलेल्या गुलाबाचे दर दुपटीने वाढून २० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढलेले दर हे २० फेब्रुवारीपर्यंत स्थिर राहणार असल्याचे एका फूल विक्रेत्याने सांगितले.

अतिवृष्टीचा फुलशेतीला फटका
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांचा परिणाम यंदा फुलांच्या उत्पादनावर झाला आहे, तसेच जानेवारीमध्ये झालेल्या अतिवृष्टीचाही फुलशेतीला फटका बसला आहे. गुलाबाच्या फुलांच्या उत्पादनाचा विचार केल्यास यंदा त्यामध्ये जवळपास ३० टक्के घट झाली आहे.
फोटो- गुलाबाच्या फुलांचे फोटो वापरावेत.

Web Title: The price of a rose in the week of love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.